मोदींना अपशब्द बोलणारे कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष अडचणीत, गुन्हा दाखल !

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून अडचणीत आलेले कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांचा पाय आणखीच खोलात गेल्याची बाब समोर आली आहे.
Shekh Husen against Narendra Modi
Shekh Husen against Narendra ModiSarkarnama

नागपूर : कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटीस पाठविली होती आणि चौकशीला बोलावले होते. याविरोधात देशभर आंदोलने झाली. नागपुरातही शहर कॉंग्रेसने ईडीच्या विरोधात आंदोलन केले होते. यावेळी बोलताना कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष यांची जीभ घसरली होती आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरले होते. आता हुसेन यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून अडचणीत आलेले कॉंग्रेसचे (Congress) माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांचा पाय आणखीच खोलात गेल्याची बाब समोर आली आहे. मोठा ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यासह विश्‍वस्ताविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी (Police) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ट्रस्टच्या विद्यमान सचिवांनी तक्रार दाखल केली होती.

शेख हुसेन अब्दुल जब्बार (वय ६८, रा. मस्कासाथ, जागनाथ बुधवारी) आणि इक्बाल इस्माईल बेलजी (वय ५०, रा. साई ललिता अपार्टमेंट., राजनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१६ या दरम्यान शेख हुसेन हे हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये अध्यक्ष होते. याशिवाय इक्बाल इस्माईल बेलजी हे विश्‍वस्त होते. यादरम्यान शेख हुसेन यांनी धर्मदाय आयुक्तांची कुठलीही परवानगी न घेता व अंकेक्षण न करता १ कोटी ४८ लाख ३७९ रुपये तर इक्बाल बेलजी यांनी ११ लाख ५२ हजार २६० रुपये असा एकूण १ कोटी ५९ लाख ५२ हजार ५८६ रुपये आपल्या खात्यात परस्पर वळवून घेत ट्रस्टची फसवणूक केली, अशी तक्रार ट्रस्टचे सचिव ताज अहमद अली अहमद सय्यद (वय ५४, रा. निराला सोसा. मोठा ताजबाग) यांनी केली.

Shekh Husen against Narendra Modi
Grampanchayat Election : नांदेडमध्ये काॅंग्रेस नंबर वन, तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर..

पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करीत, शेख हुसेन यांच्यासह विश्‍वस्तावर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाबाबत पोलिसांनीही कमालीचे मौन बाळगले आहे. शेख हुसेन यांना संपर्क केला असता, त्यांचा फोन बंद असल्याचे आढळले.

राजकीय वातावरण तापणार

केंद्र सरकारतर्फे ईडीचा गैपवापर होत आहे, असा आरोप करून कॉंग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. त्या कार्यक्रमात शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यातून भाजप आमदारांनी त्यांच्या अटकेची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा अशाप्रकारे गुन्हा दाखल झाला असल्याने यातून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in