Nilam Gorhe : धर्मेश धवनकर प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करा...

Nagpur : बैठकीतील प्राप्त तक्रारींचा आढावा प्रत्येक महिन्याला घेण्यात यावा, असे डाॅ. निलम गोऱ्हे म्हणाल्या.
Dr. Nilam Gorhe
Dr. Nilam GorheSarkarnama

Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Tukadoji Maharaj) नागपूर विद्यापीठात लैंगिक छळाच्या तक्रारीमध्ये धर्मेश धवनकर यांनी सात प्राध्यापकांकडून लाखो रुपये घेतल्याच्या प्रकरणी तपासी पोलीस अधिकारी व पोलीस आयुक्त यांची बैठक घेऊन तपासाच्या प्रगतीची माहिती घेणार आहे. तसेच लवकरच सविस्तर सर्वच विद्यापीठांची ह्वर्च्युअल आढावा बैठक ऊच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार घेण्यात येणार आहे.

महाविद्यालयीन व विद्यापीठातील (University) अत्याचाराच्या घटनांवरील उपाययोजना आणि नागपूर (Nagpur) विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या अडचणी या विषयासंदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Dr. Nilam Gorhe) यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे बैठक झाली. या बैठकीला नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. सुभाष चौधरी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव किशोर जकाते, उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रशासकीय अधिकारी सुयश दुसाने, स्त्री अभ्यास केंद्राच्या धम्मसंगिनी रमागोरख आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या, विशाखा समितीच्या बैठका विद्यापीठात व महाविद्यालयात नियमित झाल्या पाहिजेत. या बैठकीतील प्राप्त तक्रारींचा आढावा प्रत्येक महिन्याला घेण्यात यावा. तसेच प्रत्येक महाविद्यालयाच्या दर्शनी भागात तक्रार पेटी असली पाहिजे. तक्रार पेटी प्रत्येक महाविद्यालयात व विद्यापीठात ठेवली आहे की नाही, याबाबत अहवाल मागवावा. विद्यापीठात महिलांच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, किती तक्रारी निकाली निघाल्या, किती तक्रारी प्रलंबित आहेत. यांबाबत एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा. विद्यापीठ व महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थीनींच्या छेडछाडीच्या तक्रारींचा निपटारा विशाखा समितीमार्फत तात्काळ झाला पाहिजे. यासाठी आवश्कतेनुसार कायदे सहायकाची नेमणूक करण्यात यावी.

Dr. Nilam Gorhe
त्या आमदारांनी मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी... निलम गोऱ्हे

प्रसार मध्यामांकडे अशा लैंगिक तक्रारीबाबत काही विशेष माहिती असेल तर त्यांनी अंतर्गत तक्रार निवारण समिती, कुलगुरू किंवा उपसभापती कार्यालयाला कळवावे. राज्यात ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडतात, त्या घटनांच्या तक्रारीची पोलीस स्टेशनला नोंद होते. या तक्रारीचा राज्यस्तरीय डाटा बेस एकत्रित असणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीनीच्या सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन झाले पाहिजे. विद्यापीठ व महाविद्यालयांतील अत्याचाराच्या घटनांबाबत राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच घेण्यात येईल. या बैठकीत राज्यातील महिलाविषयी अत्याचाराच्या तक्रारीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी आज सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in