‘या’ कारणामुळे अधिकाऱ्यांनी फिरवली शिक्षण समितीच्या बैठकीकडे पाठ...

शिक्षण समिती सभापतींचे (Bharti Patil) विभागातील अधिकाऱ्यांसोबत अर्थपूर्ण मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी शिक्षण विभागातील Education Department अधिकाऱ्यांना बोलावले नाही.
Zillha Parishad, Nagpur.
Zillha Parishad, Nagpur.Sarkarnama

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक सोमवारी पार पडली. पण या बैठकीकडे अधिकाऱ्यांनी सपशेल पाठ फिरविली. केवळ सभापती आणि सदस्यच तेवढे उपस्थित होते. त्यामुळे कुजबुज सुरू होणे साहजिकच होते. सभापतींचे अधिकाऱ्यांसोबत अर्थपूर्ण संबंध असल्यामुळेच अधिकारी बैठकीत न येऊनही त्यांना ब्र देखील कुणी बोलले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडून उपसंचालकांच्या बैठकीची माहिती देण्यात आली नाही. सभापती भारती पाटील यांनीही त्यांना बोलावण्याचे धाडस केले नाही. शिक्षण समिती सभापतींचे विभागातील अधिकाऱ्यांसोबत अर्थपूर्ण मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना बोलावले नाही. पण अधिकारी सभापतींना गांभीर्याने घेत नसल्याची चर्चा होत आहे. त्यांच्या कार्यप्रणालीवर यापूर्वीही काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. अधिकारी नसल्याने बैठक वांझोटी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.

शिक्षण समिती सभापती भारती पाटील यांच्या अध्यक्षतेत शिक्षण समितीची बैठक पार पडली. बैठकीला फक्त सदस्य उपस्थित होते. प्राथमिक, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांसह एकही गट शिक्षणाधिकारी बैठकीला हजर नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांनी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. ही बैठक १२ ते ४ वाजेपर्यंत चालली. तर शिक्षण समितीच्या बैठकीची वेळ १ ते २ नियोजित होते. विभागाकडून तसा अजेंडाच काढण्यात आला होता. बैठकीची वेळ संपत आल्यावरही एकही अधिकारी उपस्थित झाले नाही.

क्रीडा साहित्य खरेदीवर चर्चा

अधिकारी नसल्याने सदस्यांनीच चर्चा केला. चर्चाही खरेदीबाबत होती. विद्यार्थ्यांनी खेळाचे साहित्य देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतु बैठकीत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर चर्चा झाली नाही.

Zillha Parishad, Nagpur.
नागपूर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य सभापतींवर वैतागल्या

बैठक का केली नाही तहकूब?

गेल्यावेळी सदस्यांच्या संख्येचे कारण पुढे करून स्थायी समिती व शिक्षण समितीची बैठक अध्यक्ष व सभापतींनी तहकूब केल्याची माहिती व्हॉट्स ॲपवर देण्यात आली. परंतु ही बैठक तहकूब करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com