जिल्हा परिषदेच्या इतिहासात लेकुरवाळेंच्या रुपाने पहिल्यांदाच महिला गटनेता...

उपाध्यक्षांच्या बंगल्यावर कॉंग्रेसची बैठक झाली. या बैठकीत अवंतिका लेकुरवाळे Avantika Lekurwale यांची गटनेतेपदी Group Leader नियुक्त करण्याचे जाहीर करण्यात आले.
Avantika Lekurwale with Minister Sunil Kedar and Others.
Avantika Lekurwale with Minister Sunil Kedar and Others.Sakarnama

नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत कॉंग्रेसने पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळविले. त्यानंतर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली असली तरी कॉंग्रेसने आपल्या गटनेत्याची निवड केली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच गटनेतेपदी महिला सदस्याची निवड करण्यात आली आहे. अवंतिका लेकुरवाळे या कॉंग्रेसच्या गटनेत्या बनल्या आहेत.

कॉंग्रेसने गटनेतेपदी महिलेची नियुक्ती केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे जिल्हा परिषदेत सहापैकी चार पदाधिकारी महिला आहेत. तर उपाध्यक्ष पदावरही महिलाच नियुक्त होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जि.प.मध्ये महिला राज राहील, हे जवळपास निश्‍चित झाल्यासारखेच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. यात कॉंग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या गट नेत्याचा समावेश होता. नुकतीच या १६ सदस्यांच्या निवडीसाठी पोट निवडणूक झाली.

उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. परंतु त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. दरम्यान आज गटनेत्याच्या निवडीसाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, अध्यक्षा रश्मी बर्वे, माझी उपाध्यक्ष मनोहर कुंभारेसह सर्व सदस्य उपस्थित होते. गट नेत्याबाबत सर्व सदस्यांचे मत जाणून घेण्यात आले. त्यानंतर उपाध्यक्षांच्या बंगल्यावर कॉंग्रेसची बैठक झाली. या बैठकीत अवंतिका लेकुरवाळे यांची गटनेतेपदी नियुक्त करण्याचे जाहीर करण्यात आले.

आक्रमक चेहरा..

अवंतिका लेकुरवाळे यांचे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्या पुन्हा निवडून आल्या. लेकुरवाळे पक्षातील आक्रमक चेहरा आहेत. जिल्हा परिषदेच्या सभांत त्यांची भूमिका आक्रमक असते. विरोधकांना बोलण्याची संधी कमी देतात. त्याचा प्रत्यय यापूर्वीच्या सभांमध्ये दिसून आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीतही त्या आक्रमक राहिल्या. अनधिकृत बांधकामाचा विषय त्यांनी लावून धरल्यानंतर चौकशी समिती गठित करण्यात आली.

Avantika Lekurwale with Minister Sunil Kedar and Others.
पूजाच्या पेंटींग भारावले मंत्री सुनील केदार, म्हणाले अद्भूत कलाकृती...

जनहिताच्या कार्यासोबतच ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्रामीण विकासासोबतच पक्ष वाढीसाठीही आपण प्रयत्नशील राहू. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूर जिल्ह्यातील ओबीसींची जनगणना व्हावी, यासाठी आपले प्रयत्न राहतील व त्यासंदर्भातील ठरावही जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या सर्वसाधारण सभेत घेऊ. गटनेता पद ही मोठी जबाबदारी असून, सुनील केदार यांच्या अपेक्षेप्रमाणे ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न राहील.

-अवंतिका लेकुरवाळे, कॉंग्रेस गटनेता, जि.प.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com