Fadanvis : विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी स्त्री -पुरूष आणि जाती-धर्म भेद नसतो...

Ngapur : महिला सक्षमीकरणाचे उद्दीष्ट साध्य केले जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama



Nagpur Indian Science Congress News : गेल्या ८ वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाला. तंत्रज्ञान हे असे एक टूल आहे की, ज्याला स्त्री-पुरूष आणि जाती-धर्म माहिती नसतात. त्यामुळे या प्रगतीचे फायदे सर्वांना मिळतात. यातूनच महिला सक्षमीकरणाचे उद्दीष्ट साध्य केले जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

आजपासून नागपुरात (Nagpur) सुरू झालेल्या १०८व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पार पडले. यावेळी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) सायन्स आणि टेक्नॉलॉजी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, विजयालक्ष्मी सक्सेना आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, १०८व्या राष्ट्रीय विज्ञान कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे आयोजन करण्याची संधी नागपुरला दिली, त्याबद्दल राष्ट्रीय विज्ञान कॉंग्रेसचे आभार मानायला पाहिजे. ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट ॲंड वुमन इम्पॉवरमेंट’ ही थीम आहे. सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण महिला सक्षमीकरणाची प्रतिमा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. जेंडर इक्वॅलीटीपर्यंत पोहोचण्याची ताकद विज्ञान आणि तंत्रज्ञाता आहे. जल, वायू, प्रदुषण सस्टेनेबेलचा शोध घेत आहेत. एक संकट जगावर आहे, अशा वेळी सस्टेनेबिलीटी महत्वाचा विषय आहे. संसाधनांचा उपयोग आवश्‍यक तेवढाच केला पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठीही आपण नैसर्गीक संसाधने शिल्लक ठेवली पाहिजे. ही ताकद सायन्स आणि टेक्नॉलाजीमध्येच आहे.

पंतप्रधान मोदिंच्या नेतृत्वात हे शक्य होत आहे. कोरोनाच्या काळात भारताने आपली ताकद दाखवली. भारताला तर वाचविलेच याशिवाय अनेक देशांनाही वाचविले. लसी उपलब्ध केल्या. टेक्नॉलॉजी म्हणजे एक असा टूल आहे, त्याला माहिती नसतं की स्त्री पुरूष, जाती-धर्म काय आहे. सर्वांना ही संधी मिळते. ही यशस्वी होणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात पण आपण मोठी प्रगती करणार आहोत. नारी शक्तीचा अविष्कार हा देश बघणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com