कळमना बाजाराजवळील निर्माणाधीन उड्डान पूल कोसळला, राष्ट्रवादी आक्रमक…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari २०१४ मध्ये नागपूरचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी शहरात १० हजार कोटी रुपयांची मेट्रो आणली.
Pardi Fly Over
Pardi Fly OverSarkarnama

नागपूर : कळमना बाजाराजवळील जुना पार्डी नाका परिसरातील भविष्यात नागपूरच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणारा उड्डान पुलाचा ३० मीटरचा स्लॉट काल रात्री ९.३० वाजताच्या सुमारास कोसळला. विरोधकांनी या पुलाच्या निकृष्ट बांधकामाबाबत वारंवार आक्षेप नोंदवले होते. पण सत्ताधाऱ्यांनी दखल घेतली नाही. अखेर तो पूल कोसळला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली असून प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात तेथे आंदोलन करण्यात आले.

काल ईदमुळे कळमना बाजार बंद होता. परिसरात काहीच वर्दळ नव्हती. त्यामुळे जीवित हानी झाली नाही. बाजाराचा दिवस आणि दिवसाची वेळ असती तर मोठी जीवित हानी होऊ शकली असती. काल रात्री पूल कोसळल्यानंतर तेथे नागरिकांना तोबा गर्दी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शहरात मोठी विकास कामे सुरू केली आहेत. या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड विरोधकांकडून होत होती. पण त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे कालची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २०१४ मध्ये नागपूरचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी शहरात १० हजार कोटी रुपयांची मेट्रो आणली. त्याचे काम सुरू होताच ४५० कोटी रुपये खर्चून पार्डी उड्डान पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. जून २०१४ मध्ये सुरू झालेले हे काम २०१६ मध्ये पूर्ण करावयाचे होते. पण त्यानंतर पाच वर्ष उलटून गेल्यानंतरही हे काम अर्धवट स्थितीतच आहे. या कामाचे जबाबदारी नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) कडे होती. काम सुरू असताना अनेक पिल्लर्सला तडे गेले असल्याची तक्रार विरोधकांनी एनएचयुआयकडे केली. पण त्याची आजपर्यंत दखल घेतली गेली नाही.

कामाचे ऑडिट करावे..

या मार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या इतर भागांतही पिल्लर्सना तडे गेले आहेत. पुढील काळात यापेक्षाही मोठी दुर्घटना येथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांचे जीव धोक्यात टाकायचे नसतील तर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून महाविकास आघाडी सरकारने या कामाचे ऑडिट करावे, अशी मागणी घटनास्थळी नागरिकांकडून केली गेली.

Pardi Fly Over
प्रशासन म्हणते, थोडं थांबा... नितीन गडकरी यांची पूजा सुरू आहे!

राष्ट्रवादी आक्रमक..

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रशांत पवार आणि नगरसेवक व शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांच्या नेतृत्वात आज दुर्घटना झालेल्या परिसरात आक्रमक आंदोलन करण्यात आले. या पुलाच्या कामाचे ऑडिट व्हावे, अशी मागणी वारंवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन करण्यात आली. पण गडकरींनी कंत्राटदारांना नेहमीच क्लिन चिट दिली. त्याचाच परिणाम म्हणून काल पूल कोसळला. आता शहरातील सर्व पुलांच्या बांधकामाचे ऑडिट करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com