Atul Londhe : आधी आंतरराष्ट्रीय वित्त संस्था, नंतर हिरे व्यापार आणि आता वेदांता; पुढे काय..?

हा निर्णय राज्य सरकारला मागे घ्यावा लागेल. तो त्यांनी तात्काळ घ्यावा. अन्यथा यासाठी कॉंग्रेस उग्र आंदोलन करेल आणि राज्यातील बेरोजगारांना न्याय मिळवून देईल, असे अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले.
Atul Londhe
Atul LondheSarkarnama

नागपूर : एक लाखाहून अधिक रोजगार निर्माण करणारा वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला नेण्यात आला आहे. यासाठी ईडी (ED) सरकारची स्थापना झाली काय? केंद्राच्या दबावाला बळी पडून महाराष्ट्राचे आणि बेरोजगार युवकांचे नुकसान ईडी सरकारने केले आहे, अशी जळजळीत टिका कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात लोंढे (Atul Londhe) यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी या प्रकल्पासाठी क्षमता अहवालच टाकलेला आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘केंद्रीय दबावाला बळी पडून महाराष्ट्राचे आणि बेरोजगार युवकांचे नुकसान #ED सरकारने केले आहे. हा घ्या ढळढळीत पुरावा. फसणविस सरकार आले की असे का होते पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था नंतर हिरे व्यापार गुजरातला दिला आता फक्त मुंबई तेव्हढी शिल्लक राहिली आहे? हे राम!’

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यानंतर विविध क्षेत्रातील लोकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेसचे (Congress) नेते तर सरकारवर तुटून पडले आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात (Maharashtra) साकार होण्याची पूर्ण क्षमता होती. तसा क्षमता अहवालही देण्यात आला होता. पण केंद्र सरकारच्या तालावर नाचणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात त्यांना मदतच केली आहे. आता मुंबईच गुजरातमध्ये नेण्याचे तेवढे शिल्लक राहिले आहे. तेसुद्धा करण्यात हे लोक कुठलीही कसर ठेवणार नाही, असेही लोंढे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

Atul Londhe
अतुल लोंढे म्हणाले, एमआयएमने काँग्रेसची चिंता करू नये...

या सरकारच्या स्थापनेची सुरूवातच गुजरातमधील सुरत मधून झाली आहे. त्यामुळे हे सरकार गुजरातच्या हिताचाच विचार करणार आहे. यांच्याकडून दुसरी कुठली अपेक्ष करणे गैर आहे. पण महाराष्ट्राचे आणि येथील बेरोजगारांचे नुकसान करणारा हा निर्णय राज्य सरकारला मागे घ्यावा लागेल. तो त्यांनी तात्काळ घ्यावा. अन्यथा यासाठी कॉंग्रेस उग्र आंदोलन करेल आणि राज्यातील बेरोजगारांना न्याय मिळवून देईल, असे अतुल लोंढे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com