शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यावर चार गोळ्या झाडल्या; एक गोळी छातीत लागल्याने जागीच मृत्यू

गोळीबारानंतर डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
Umarkhed firing
Umarkhed firingsarkarnama

उमरखेड (जि. यवतमाळ) : उमरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा दुचाकीवर आलेल्या अनोळखी मारेकऱ्यांनी बेछूट गोळीबार (firing) करत खून केला. येथील शासकीय रुग्णालयासमोर मंगळवारी (ता. ११) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबारानंतर डॉक्टर (doctor) रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. जिल्ह्यातील वैद्यकीय वर्तुळ या घटनेने हादरून गेले आहे. (firing at Umarkhed medical officer; He died on spot after being hit by four bullets)

उमरखेड येथील राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयात डॉ. हनुमंत धर्मकारे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत होते. महिनाभरापासून ते रजेवर होते. सुटीनंतर ते आज कामावर रुजू झाले होते. कामावर रुजू झाल्याची दप्तरात नोंद करून ते रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या कॅन्टिनवर चहा घेण्यासाठी बाहेर आले होते. तेवढ्यात दुचाकीवरून आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. त्या मारेकऱ्याने लागोपाठ चार गोळ्या डॉ. धर्माकारे यांच्यावर झाडल्या. त्यातील एक गोळी डॉक्टरांच्या छातीवर तर, तीन गोळ्या पाठीवर लागल्या आहेत.

Umarkhed firing
भाजपला आणखी एक धक्का : माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार!

उपस्थित नागरिकांनी गोळीबाराची घटना पाहून आरडाओरड केली, त्यामुळे घटनास्थळावरून मारेकरी हे दुचाकीवरून वेगाने पसार झाले. डॉ धर्मकारे यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉ. धर्मकारे यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मांडण यांनी दिली. उमरखेड शहरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस अनोळखी मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

Umarkhed firing
राष्ट्रवादीतील प्रस्थापितांच्या मनमानीमुळे रिक्षावाला ठरला ३५ दिवसांचा उपनगराध्यक्ष!

मनमिळावू धर्मकारेंवरील हल्ल्याने हळहळ

डॉक्टरांवरील हल्ल्याची घटना कळताच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी तत्काळ उमरखेड येथे भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, ठाणेदार अमोल माळवे यांनी रुग्णालय परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असलेले डॉक्टर धर्मकारे यांच्यावर हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हे कळू शकले नाही. बालरोग तज्ज्ञ असलेले डॉ. धर्मकारे हे मागील सात-आठ वर्षांपासून उमरखेड शासकीय रुग्णालयात कार्यरत होते. त्यांचा शहरात चांगला परिचय होता. हल्ल्याची वार्ता शहरात पसरताच नागरिकांनी रुग्णालयात परिसरात एकच गर्दी केली होती.

Umarkhed firing
राष्ट्रवादीत प्रवेश करताच काँग्रेसचे नेते म्हणाले ‘यूपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे’

माजी गृहराज्यमंत्र्यांची भेट

शहरात योगायोगाने माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील आले होते. त्यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी आमदार नामदेव ससाणे, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्यासमवेत शासकीय रुग्णालयाला भेट दिली. याशिवाय काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस तातू देशमुख, माजी आमदार विजयराव खडसे यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com