Film City महाराष्ट्रातच राहिल आणि निर्माते दिग्दर्शकही इतर राज्यांत जाणार नाहीत...

Sudhir Mungantiwar : जगातली उत्तम फिल्मसीटी करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

Maharashtra Film City News : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) फिल्मसीटी निर्माण करणार आहेत की नाही किंवा त्याबाबतीत त्यांचे काय नियोजन आहे, हे मला माहिती नाही. पण महाराष्ट्रात (Maharashtra) आपली जी फिल्मसीटी आहे, तिला जगातली उत्तम फिल्मसीटी करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे, असे राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

साधारणतः ५२१ एकर जमिन मुंबईत आहे. यात चार भागामध्ये काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी संवाद करायचा, असं ठरवलं आहे. चित्रपटसृष्टीसाठी जे अत्याधुनिक तंत्रज्ञान लागतं ते तिथे उपलब्ध करून द्यायचं, तसे स्टुडीओ तेथे उपलब्ध करून द्यायचे आणि हे चित्रपटाशी संबंधित ज्ञान देणारे केंद्र व्हावे, त्यासाठी एक सेक्टर तयार करायचा आहे. याशिवाय तेथे आपण काही नैसर्गित स्थळे शुटींसाठी उपलब्ध करून देऊ शकतो का, या दिशेनेही काम सुरू असल्याचे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जे आंतरराष्ट्रीय पर्यटत येतात, ते २४ तासांच्या आत मुंबई सोडतात. अशा पर्यंटकांसाठी काही सुविधा उपलब्ध करून देता येतील का, यावरही काम सुरू आहे. बाजुलाच १०४ स्क्वेअर किलोमीटरचा अर्बन पार्क आहे. लंडनचा अहिड पार्क, न्यूयाॅर्कचा सेंट्रल पार्क यापेक्षा मोठा आणि चांगला १०४ स्क्वेअर किलोमीटरचा पार्क निसर्गाने आपल्याला दिला आहे. त्याला आणखी विकसीत करू शकतो, तर पर्यटन वाढवणयासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे. यासाठी काल आमची विस्तृत बैठक आणि आणि त्यासाठी आम्ही कामही सुरू केले आहे.

Sudhir Mungantiwar
मुनगंटीवार कडाडले; वेकोलि अधिकाऱ्यांना म्हणाले, रहिवाशांना त्रास द्याल तर, याद राखा !

सध्या फिल्मसीटीबाबत ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्यात काही तथ्य नाही. फिल्मसीटी महाराष्ट्रातच राहणार आहे. येथील निर्माते आणि दिग्दर्शक इतर राज्यांत जाऊ नये, यासाठी आम्ही चांगल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत आहोत. पूर्वी परवानगी घ्यावी लागायची, आता आम्ही त्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. या व्यकिरिक्त महाष्ट्रात कुठेही शुटींग करताना स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकार त्यासाठी एकही पैसा आकारणार नाही. यापूर्वी असे नव्हते. चार-पाच ठिकाणी शुटींग असले की त्यांनी एनओसी आणाव्या लागत होत्या. यापुढे निर्मात्यांना तो त्रास होणार नाही. कारण सर्व एनओसी सरकार आता एका क्लिकवर देणार आहे. मुख्य सचिवांसोबत याची बैठक नुकतीच पार पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची फिल्मसीटी कुठेही जाणार नाही, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com