आमदार मिटकरी यांच्या विरोधात अकोला पोलिसात तक्रार दाखल...

आमदार मिटकरी (MLA Amol MItkari) यांनी हीन दर्जाचे तथ्यहीन, आधारहीन धार्मिक भावना भडकवणारे, धार्मिक मारोती स्त्रोत्राचे अत्यंत अभद्र टिप्पणी करणारे व्यंगात्मक भाषण केल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आला.
आमदार मिटकरी यांच्या विरोधात अकोला पोलिसात तक्रार दाखल...
Complaint against MLA Amol MitkariSarkarnama

अकोला : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जाहीर सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या व्यक्तव्याने एका विशिष्ट जाती व संविधानाचा अवमान केला असल्याची तक्रार अकोला (Akola) येथील ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी काल सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनला केली. (Amol Mitkari News Updates)

आमदार मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी हीन दर्जाचे तथ्यहीन, आधारहीन धार्मिक भावना भडकवणारे, धार्मिक मारोती स्त्रोत्राचे अत्यंत अभद्र टिप्पणी करणारे व ब्राह्मण समाजाची मानहानी करणारे व अपमानित करणारे व्यंगात्मक भाषण केल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आलेल्या पोलिस तक्रारीत केला आहे. या तक्रारीत त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांनी ज्या स्त्रोत्राचा आधार घेतला त्या स्त्रोत्राचा अर्थही दिला आहे. राज्याचे दोन कॅबिनेट दर्जाचे मंत्री उपस्थित असताना त्यांच्यापुढे एका विशिष्ट जातीला वारंवार अपमानीत करण्याचे काम आमदार अमोल मिटकरी यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आमदार मिटकरी यांनी संविधानाचासुद्धा अपमान केल्याचे दिसून येत असल्याचे सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकांच्या नावे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी उदय महाराज, विजय तिवारी, अमोल चिंचाळे यांनी दिली आहे. ही तक्रार देताना निलेश देव यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Complaint against MLA Amol Mitkari
Video : ...तर थिल्लर मिटकरी असा त्यांचा उल्लेख होईल !

इस्लामपूर येथे आमदार अमोल मिटकरी यांनी जे वक्तव्य केले, ते ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारे होते. त्यावर कळस म्हणजे राज्यातील दोन कॅबिनेट मंत्रीसुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर हसत होते. पण त्यांनी आमदार मिटकरींना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे या समाजाची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर नाराजी आहे. दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव सांगून राजकारण करणाऱ्या नेत्याला हे कृत्य न शोभणारे आहे, असे मत ब्राम्हण समाजातील लोकांनी व्यक्त केले आहे. आता आमदार अमोल मिटकरींनी माफी मागितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असेही ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.