शेतकऱ्यांना दिलासा; पीक विम्याचे ६४ कोटी रुपये मिळणार

नैसर्गिक संकटाची मालिका यावर्षी देखील कायम आहे.
Dada Bhuse, Prataprao Jadhav, Sanjay Kute
Dada Bhuse, Prataprao Jadhav, Sanjay Kutesarkarnama

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विमा (Crop Insurance) भरला होता. मात्र, शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक असताना विमा कंपनी नकारघंटा वाजवत होती. मात्र, बुलडाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी पाठपुरावा केला. आज अखेर यात मार्ग निघाला असून गतवर्षीचा थकीत असलेला ६४ कोटी रुपयांचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. आठ दिवसातच ही विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Dada Bhuse, Prataprao Jadhav, Sanjay Kute
राजकारण तापलं! संजय राऊत थेट राहुल गांधींच्या भेटीला

बुलडाणा जिल्ह्यातील पीक विम्याचे काम रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे आहे. मायबाप शेतकरी आणि शासनाकडून घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या हप्त्यापोटी अडचणीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सदर कंपनी सातत्याने नकारघंटा वाजवत होती. बुलढाणा जिल्ह्यात घाटावर व घाटाखाली मिळून तब्बल ६४ कोटी रुपये एवढी रक्कम विमा कंपनीला शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. खरीप हंगाम २०२०-२१ च्या ७० हजार २९५ शेतकऱ्यांचा पिक विमा शासनाच्या पंचनाम्यात अंतिम मंजूर झाला होता. यातील केवळ १८ हजार ८९८ शेतकऱ्यांना विमा कंपनीने पीक विम्याची रक्कम दिली. तब्बल ५१ हजार ३९७ शेतकऱ्यांना झुलवत ठेवले. जाधव यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. यासंबंधी मंत्रालयात बैठका देखील पार पडल्या. ५ ऑक्टोंबर रोजी मुंबईत भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

यावेळी प्रतापराव जाधव, पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार डॉ. संजय कुटे, शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, कृषी सचिव एकनाथ डवले, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता धनश्रीराम शिंपणे, सरपंच रामेश्वर थारकर यांच्यासह पीक विमा कंपनीचे अधिकारी व शासनाचे कृषी व महसूल सह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते. जाधव यांनी या वेळी वास्तव सगळ्यांच्या लक्षात आणून देत कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिल्ह्यातील पन्नास हजारापेक्षा अधिक शेतकर्‍यांचे हक्काचे पैसे कंपनी देण्यास टाळाटाळ का करते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या चर्चेअंती आठ दिवसात ६४ कोटी रुपयांची रक्कम द्यायला रिलायन्स इन्शुरन्स कंपनी तयार झाली आहे.

Dada Bhuse, Prataprao Jadhav, Sanjay Kute
बच्चू कडूंचा दे धक्का; काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना पराभूत करत जिल्हा बॅंकेत एन्ट्री

नैसर्गिक संकटाची मालिका यावर्षी देखील कायम आहे. अतीवृष्टीमुळे यंदाही साडेसात लाख हेक्टर पैकी एकूण जवळपास २० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीप हंगाम नुकसान झाली आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी अडचणीत असताना पिक विमा हा या शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर येण्यासाठी हातभार म्हणून देण्यात येतो. शासन याची तरतूद करते. मात्र, संबंधित कंपन्या शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारतात. हे खपवून घेतले जाणार नाही. गतवर्षीच्या हक्काच्या पिक विमाच्या बाबतीत असलेले डीसपुट आता मार्गी लागले आहे. कंपनीने दिलेल्या शब्दाला जागावे आणि आठ दिवसात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. तसेच यंदाच्या हंगामात झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा जर वेळेवर मिळाला नाही, तर गाठ शिवसेनेशी राहील. आम्ही सत्ताधारी असलो तरी आधी शिवसैनिक आहोत हे देखील विसरून जाऊ नका, असा गर्भित इशारा जाधव यांनी विमा कंपन्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com