Farmers News: ५० खोके द्यायला पैसा आहे; शेतकऱ्यांसाठी का नाही? विरोधकांची सरकारवर गारपीट !

Eknath Khadse: अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे अद्याप झाले नाहीत.
Eknath Khadse and Ambadas Danve
Eknath Khadse and Ambadas DanveSarkarnama

Mumbai Legislative Councils News: मागच्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि काल झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. सरकार संवेदनशील नाही, असे म्हणत विरोधी पक्ष सरकारवर बरसला. आज सकाळी विधानपरिषदेचे सभागृह सुरू होताच विरोधकांनी सरकारवर गारपीट केली. (Damage assessment is not done yet)

एकनाथ खडसे म्हणाले, काही वर्षांपूर्वीची स्थिती बघितली तर शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याचे एकही उदाहरण सापडत नाही. तेव्हा पोट भरण्यापूरते धान्य प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी राहत होते. आता केवळ एकनाथ शिंदेंच्या सात महिन्याच्या काळात ही उद्धवली असे नाही, तर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही अवस्था झाली आहे. शेतकरी मरमर मरतो आहे. पण उत्पन्न मिळत नाही. मिळाले उत्पन्न तर भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत.

महागाई वाढत चालली. शेतमालाला भाव नाही. महागाईनं उच्चांक गाठला. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. सरकार फक्त पाठ थोपटून घेत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दादा भुसे मंत्री होते. निम्म्यापेक्षा जास्त महाविकासमधील मंत्री आता इकडे सत्तेत आलेले आहेत. त्या सरकारने चुका केल्या असे तुम्ही आज म्हणता, तर त्याचे भागीदार तुम्हीही आहात. आता त्यांच्यावर टिका करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही, अशा शब्दांत खडसेंना मंत्र्यांना खडसावले.

गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळ आणि गारपिटीने थैमान घातले आहे. शेतकरी पार झोपून गेला. फळबागा नष्ट झाल्या. कापसाचे पीक गेले. भाजीपाला गेला, फळे गेली, एक पानही झाडांना शिल्लक राहिले नाही. फळबागांमध्ये फळांचा सडा पडला आहे. किती मंत्री बांधावर गेले? कृषिमंत्री अब्दुल सत्तार बांधावर गेल्याची फीत मी पाहिली आहे. पण इतर मंत्री बांधांवरही नाही तर गुवाहाटीलासुद्धा नव्हते, असे म्हणत खडसेंनी (Eknath Khadse) मंत्र्यांना पुन्हा टोला लगावला.

Eknath Khadse and Ambadas Danve
Eknath Khadse : खडसेंचा दणका; विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करताच अन्न व औषध प्रशासन अॅक्शन मोडवर

मत्र्यांना वेळ नाही आणि अधिकारी कर्मचारी संपावर आहेत. तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी कामावर नाही. शेतकरी ढसाढसा रडतोय. सरकारला (State Government) त्याचं अश्रू दिसत नाही. शेतकरी (Farmers) उर बडवतोय, त्याचे अश्रू पुसायला कुणी गेले नाही. द्राक्ष, केळी, मिरचीचे नुकसान झाले. कुणी जायला तयार नाही.

पंचनामे नाहीत, मंत्री बघायला तयार नाहीत. पंचनामे करायला कुणीच नाही. यावर सरकारने उपाय काढून मरणाच्या दारात असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टिका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com