शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला अपघात

२४ नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैठकीसाठी रविकांत तुपकर (Ravikat tupkar) मुंबईला जात होते.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला अपघात
Ravikant Tupkar

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या गाडीला सोमवारी (२२ नोव्हेंबर) रात्री अपघात झाला. ते बुलढाण्याहून मुंबईला जात असताना बेराळा फाटा (ता. चिखली) याठिकाणी त्यांचा अपघात झाला. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार २४ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी रविकांत तुपकर हे सौरभ सावजी यांच्या मालकीच्या इनोव्हा कारने मुंबईसाठी निघाले होते. बुलढाण्याहून मुंबईला जात असताना बेराळा फाट्यानजीक रस्ता ओलांडणारे दोन दुचाकीस्वार तुपकरांच्या गाडीला धडकले. यात दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले.

Ravikant Tupkar
शाळा सुरु करण्यास मुंबई महापालिका अनुकूल, पण टास्क फोर्स म्हणते...

गजानन सोळंकी आणि तुषार परिहार अशी जखमी तरुणांची नावे आहेत. अपघात घडताच तुपकरांनी दोघांनाही आपल्या वाहनात घेऊन जवळच्याच डॉ. महिंद्रे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोन्ही तरुणांना औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. स्वतः रविकांत तुपकर जखमी तरुणांना औरंगाबादला घेऊन गेले आहेत.

अपघात झालेले दोघेही चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्याकडे भरधाव वेगाने जात होते. रस्ता ओलांडत असताना दुचाकी तुपकरांच्या वाहनावर आदळली. दुचाकी चालवणारा तरुण हा नवीनच दुचाकी चालवायला शिकला होता. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. यात तुपकरांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in