नागपुरात फडणवीसांचे जंगी स्वागत, पण अमित शहांवरची नाराजी अद्यापही कायम ?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री (Chief Minister) होणार हे निश्‍चित होते.
Devendra Fadanvis News, Nagpur News
Devendra Fadanvis News, Nagpur NewsSarkarnama

नागपूर : राज्यातील अनेक नाट्यमय आणि धक्कादायक घडामोडींनंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर माजी महापौर संदीप जोशी यांनी फडणवीसांच्या अभिनंदनाच्या फलकावरून भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा फोटो गायब होता.(Devendra Fadanvis News)

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री (Chief Minister) होणार हे निश्‍चित होते. कारण महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) खाली खेचण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून फडणवीसांनी रात्रंदिवस एक केला होता. त्यामुळे सत्तांतर झाल्यावर फडणवीसच मुख्यमंत्री होणार अशी आशा नव्हे तर खात्री त्यांच्या समर्थकांना होती. पण त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा स्वतः फडणवीसांनी केली. आपण मंत्रिमंडळात राहणार नसून सरकारच्या मार्गदर्शकाची भूमिका वठवणार आहो, असेही त्यांनी सांगितले होते.

पत्रकार परिषद ते शपधविधी या कालावधीत पुन्हा काही नाट्यमय व धक्कादायक घडामोडी घडल्या. मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असे सांगणाऱ्या फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपद हुकल्यानंतर फडणवीस नाराज दिसतच होते. पण उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना त्यांच्या चेहऱ्यावरून नाराजीत भर पडल्याचे दिसत होते. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. त्यानंतर मात्र फडणवीस समर्थकांचा बांध फुटला असावा. कारण त्यानंतर अभिनंदनाच्या फलकांवर अमित शहा यांना स्थान देण्यात आले नव्हते.

अभिनंदनाची फलकं माजी महापौर संदीप जोशी यांनी लावली होती. ‘सरकारनामा’ने त्यांच्याशी संपर्क साधून अमित शहांचा (Amit Shaha) फोटो नसल्याचे कारण विचारले असता, प्रोटोकॉलनुसार सर्व ज्येष्ठ नेत्यांचे फोटो आम्ही लावलेले आहेत, असे उत्तर त्यांनी दिले होते. यानंतरही प्रोटोकॉलचे कारण पुढे करणे म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रकार असल्याची चर्चा नंतर रंगली. तेव्हापासूनच फडणवीस आणि त्यांचे समर्थक अमित शहांवर नाराज असल्याचे बोलले जाऊ लागले. राज्यातील सत्तांतरानंतर आज प्रथमच नागपुरात आलेल्या फडणवीसांचे भाजपने जंगी स्वागत केले. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स, बॅनर लावले. पण आजही फलकांवरून अमित शहांचा फोटो गायब होता. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची अमित शहांवरची नाराजी अद्यापही कायम असल्याची चर्चा शहरात मिरवणुकीदरम्यान रंगली आहे.

Devendra Fadanvis News, Nagpur News
शिंदे-फडणवीस जोडी 200 आमदार निवडून आणणार : नाहीतर शेती करायला जाणार..

राष्ट्र पहीले, नंतर पक्ष आणि शेवटी मी, या उक्तीनुसार देवेंद्र फडणवीसांनी आचरण ठेवले आहे, असा मजकूर फलकांवर आहे. म्हणजे केवळ पक्षादेश म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारले, अन्यथा या निर्णयाने ते समाधानी नाहीत, असेच फडणवीस समर्थकांचे म्हणणे असावे, असे वाटते. एका फलकावर ‘...करिष्ये वचनं तव, पक्षादेश.. सर्वोपरि...’, असा मजकूर आहे. त्यामुळे फडणवीस आणि त्यांचे समर्थक नक्कीच शहांवर नाराज आहे, अशी जोरदार चर्चा आज त्यांच्या मिरवणुकीदरम्यान होत आहे. मिरवणूक संपल्यावर धरमपेठ परिसरात जाहिर सभा होणार आहे. त्यावेळी फडणवीस काय बोलणार? अमित शहांच्या बाबतीत भाष्य करणार का, हे आता बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com