आमदार फुकेंच्या पत्राची फडणवीसांनी घेतली दखल; नक्षलग्रस्त भागातील पोलीसांना दीडपट पगार..

आमदार डॉ. परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांनी नक्षलग्रस्त अशा संवेदनशील गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेतली होती.
Devendra Fadanvis and MLC Dr. Parinay Fuke
Devendra Fadanvis and MLC Dr. Parinay FukeSarkarnama

गोंदिया : नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०११ पासून नक्षलविरोधी मोहिमेसाठी दीडपट पगार दिला जात होता, मात्र एप्रिल २०२१ पासून तो जारी न करता मागील महाविकास आघाडी सरकारने दीडपट पगार बंद करून त्यांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न केला होता.

२४ सप्टेंबर २०२२ रोजी सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारमध्ये गोंदिया -भंडारा (Bhandara) विधानपरिषद क्षेत्राचे आमदार डॉ. परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांनी नक्षलग्रस्त अशा संवेदनशील गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या या गंभीर प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जिल्ह्याच्या धर्तीवर गोंदिया जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानात सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे दीडपट पगार व महागाई भत्ता देण्याची मागणी केली होती.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार डॉ. फुके यांच्या पत्राची दखल घेत नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवत पगारात दीड पटीने वाढ करून महागाई भत्ता देण्याचे आदेश गृहविभागाला दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे आदेश प्राप्त होताच गृह विभागाने ३ ऑक्टोबर २०२२ रोजी एनएएक्स ०७२०प्र क्र-११०/विशा १ब मुंबई हा शासन निर्णय जारी केला, ज्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनात दीडपट वाढ करुन महागाई भत्ता लागू केला आहे.

Devendra Fadanvis and MLC Dr. Parinay Fuke
फडणीसांनी सांगितला, परिणय फुके पालकमंत्री झाल्यावर पहिल्या दौऱ्याचा 'तो' किस्सा..

आमदार डाॅ. फुके यांचा पुढाकार आणि त्यांना प्रतिसाद देणारे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपरोक्त आदेशाने गोंदिया जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा निर्णय म्हणजे नक्षलग्रस्त भागात अधिक जोमाने कार करण्यासाठीची प्रेरणा आहे, अशा प्रतिक्रिया पोलिस दलात व्यक होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com