फडणवीस म्हणाले, आता मिशन महाराष्ट्र; तर गडकरी म्हणाले, महापालिका जिंका...

भाजपने गोव्याची संधी दिली. त्याचे आपण सोने केले. आता महापालिका आणि राज्य जिंकण्याचे आपले लक्ष्य असल्याचे यावेळी फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले.
Nitin Gadkari and Devendra Fadanvis
Nitin Gadkari and Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : गोव्यात सत्ता मिळविल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाजपने नागपुरात जंगी स्वागत केले. गोव्याच्या विजयानंतर आता पुढचे मिशन महाराष्ट्र, असे फडणवीस यावेळी म्हणाले. तर आता महानगरपालिका जिंकण्याचा संकल्प करा, असे केंद्रीय नितीन गडकरी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.

महाराष्ट्रात (Maharashtra) स्वबळावर भाजपची सत्ता आणू असे फडणवीस म्हणाले. फडणवीस यांची विमानतळ ते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे निवासस्थान अशी रॅली काढून स्वागत करण्यात आले. गडकरींच्या घरासमोर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारात लिप्त झाले असल्याचा आरोप केला. दोन मंत्री कोठडीत आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना फसवण्याचे प्रयत्न केले जात आहे. सरकारने आमच्यावर कितीही केसेस दाखल केल्या तरी आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणे बंद करणार नाही. भाजपने गोव्याची संधी दिली. त्याचे आपण सोने केले. आता महापालिका आणि राज्य जिंकण्याचे आपले लक्ष्य असल्याचे यावेळी फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले.

कार्यक्रमाला शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, खासदार. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, टेकचंद सावरकर, माजी आमदार गिरीश व्यास, मिलिंद माने, महापौर दयाशंकर तिवारी, वीरेंद्र कुकरेजा, अशोक मेंढे, संजय बंगाले, धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर, अश्विनी जिचकार, बाल्या बोरकर, नीती ठाकरे, चंदन गोस्वामी, रुपा रॉय, राजेंद्र सायरे, अनिरुद्ध पालकर, संजय गिरगावकर ,अभय भांडारकर आदी उपस्थित होते.

Nitin Gadkari and Devendra Fadanvis
भाजपचं ठरलं : कोल्हापूर उत्तरमधून लढणार; फडणवीस दिल्लीतून उमेदवार जाहीर करणार

मनपा जिंकण्याचा संकल्प करा : गडकरी

नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना गोव्याच्या जनतेने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची जागा दाखवून दिल्याचे सांगितले. पाच राज्यातील जनतेने जातीपाती ऐवजी विकासाला मते दिले आहेत. आता प्रत्येकाने महापालिका जिंकण्याचा संकल्प करावा असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com