Fadanvis : फडणवीस म्हणाले; दादांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले, त्यांची सूचना मान्य…

अजित पवारांच्या (Ajit Pawar) बोलण्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मुंबई-पुणे रोडच्या इंटलिजंट सिस्टमचे काम सुरू आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
Ajit Pawar and Devendra Fadanvis
Ajit Pawar and Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधनानंतर रस्ता सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आज तिसऱ्या दिवशीही या विषयावर सभागृहात चर्चा झाली. यावेळी रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितल्या. त्यावर दादांना अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले, त्यांच्या सूचना मान्य आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवारांच्या (Ajit Pawar)बोलण्यावर उत्तर देताना फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, मुंबई-पुणे रोडच्या इंटलिजंट सिस्टमचे काम सुरू आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे. यामध्ये अधिक माहिती घेतली असता, असे लक्षात आले की, जे काही कंजेशन होते, ते घाटाच्या भागात होते आणि त्यापुढचा रस्ता अधिक कंजेशन होत जात. त्यावर सरकारने काम सुरू केले आहे. या रोडवरचा जाम संपेल आणि अंतरही कमी होईल, यावर उपाययोजना केल्या जात आहेत.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या सूचना अगदी योग्य आहेत. जाणार रस्ता चार लेन आणि येणार रस्ता चार लेन, असा आठ लेनचा रस्ता करण्याची त्यांची सूचना मान्य आहे. त्या रस्त्यावर जागेची उपलब्धता बघून लवकरच त्यावर सकारात्मकपणे निर्णय घेतला जाईल. याबाबत तात्काळ मुख्यमंत्र्यांनाही सांगू. हे काम लवकरात लवकर करावे लागणार आहे. कारण मिसींग लिंक झाल्यावर ट्रॅफीक वाढतच जाणार आहे. चौथ्या लेनसाठी सकारात्मक पावले उचलू, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

एडीजी दर्जाचे अधिकारी करणार तपास..

विनायक मेंटेंच्या ड्रायवरचे स्टेटमेंट सतत बदल आहे. हे आम्हीसुद्धा माध्यमांवर बघत आहोत. त्यामुळे हा घातपात आहे की नाही, याबाबत कुठलीही शंका कुणाला राहू नये, म्हणून सीआयडीला हे प्रकरण सोपवले आहे. त्याशिवाय एडीजी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडेही या प्रकरणाचा तपास सोपविण्यात येणार आहे. प्राथमिक चुका कुणाच्या आहेत, प्रशासकीय चूक कुणाची आहे का, याची चौकशी हे अधिकारी करतील. यात कुणीही चुकीचा आढळला तर त्याला सोडले जाणार नाही. क्राईमच्या बाबतीतला सर्व तपास सीबीआय करेल, असे फडणवीसांनी सांगितले.

Ajit Pawar and Devendra Fadanvis
Ajit Pawar : अजित दादा म्हणाले सत्ताधाऱ्यांना, हे वागणं बरं नव्हं..!

नेत्यांनी रात्रीचा प्रवास टाळावा..

आपण सर्व लोकप्रतिनिधी आहोत. जनतेच्या कामाकरिता आपल्याला सतत प्रवास करावा लागतो. पण नेत्यांनी रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे. रात्री ३ ते ६ या वेळात प्रवास टाळला पाहिजे. या वेळात ड्रायव्हरला झोपेची झपकी येते. त्यामुळे हे अपघात होतात. मी देखील असा प्रवास करतो. पण यापुढे काळजी घेणार आहे. आपण सर्वांनी या गोष्टी टाळल्या पाहिजे. विनायक मेटेंनाही त्यांच्या पत्नीने सांगितले होते की, पुण्याहून रात्री निघू नका, सकाळी निघा. सकाळी निघाले तरी तुम्ही वेळेत पोहोचाल, पण त्यांनी ऐकले नाही. असेही फडणवीसांनी सभागृहात सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com