Devendra Fadanvis Case : फडणवीसांवरील खटल्याचा ८ सप्टेंबरला निकाल ; वाचा, काय आहे प्रकरण?

Devendra Fadanvis Politics : मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात फडणवीसांना आधी क्लीनचिट दिली होती.
Devendra Fadanvis  News :
Devendra Fadanvis News : Sarkaenama

Nagpur News : राज्यातील २०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हेगारी खटल्यांची माहिती दिली नव्हती. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.नागपूर न्यायालयात त्यांच्याविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तीवाद पूर्ण झाले असून येत्या ८ सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.

न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, नजरचुकीने हे दोन गुन्हे नमुद करण्यातच राहून गेलं असा युक्तीवाद फडणवीसांच्या बाजूने करण्यात आला. तसेच, यापेक्षाही गंभीर गुन्ह्यांची नोंद प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे. पण केवळ नजरचुकीने हे गुन्हे दाखल करण्याचे राहून गेल्याचंही फडणवीसांच्या वकिलांनी यावेळी स्पष्ट केलं. या संदर्भात सतीश उके यांनी फडणवीसांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल खरंतर आजच लागणार होता. मात्र न्यायालयाने निकालाची तारीख तीन दिवसांनी पुढे ढकलली आहे.

Devendra Fadanvis  News :
Samruddhi Mahamarg News : 'समृद्धी'वरील प्रकल्पांना मोदी सरकारकडून निधीची शक्यता; अहवाल केंद्राकडे पाठवणार..

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात फडणवीसांना आधी क्लीनचिट दिली होती. त्याला वकील सतीश उइके यांनी सर्वोच्च न्यायालयातही आव्हान दिलं होतं. या प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर येत्या ८ सप्टेंबरला या खटल्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Devendra Fadanvis  News :
Jalna Maratha Protest : दुतोंडी सरकारच्या ढोंगीपणाचा बुरखा फाटला; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस-पवारांवर हल्लाबोल

काय आहे प्रकरण?

नागपुरचे अॅड. सतीश उके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. देवेंद्र फडणवीसांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर प्रलंबित असलेल्या गुन्हेगारी प्रकरणाची माहितीची नोंद केली नाही. 1996 आणि 1998 मध्ये फडणवीसांवर बनावट कागदपत्र आणि फसवणुकीप्रकरणी गुन्हे दाखल होते. हे दोन्ही गुन्हे नागपूरमधील होते. त्यातील एक गुन्हा मानहानीचा आणि दुसरा गुन्हा फसवणुकीचा असल्याचं उके यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं. तसेच या दोन्ही तक्रारी खाजगी स्वरूपाच्या तक्रारी होत्या.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in