Devendra Fadanvis : शहा-खडसे भेटीवर फडणवीसांचे तीन शब्दांत उत्तर !

महाराष्ट्र आणि भारतात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे कुणीही असो, त्यांना सोडणार नाही. अशांवर कठोर कारवाई करू, असे (Devendra Fadanvis) म्हणाले.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : पुण्यामध्ये (Pune) पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात आज नागपुरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, महाराष्ट्र आणि भारतात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे कुणीही असो, त्यांना सोडणार नाही. अशांवर कठोर कारवाई करू, असे ते म्हणाले.

पाकिस्तान (Pakistan) जिंदाबादचे नारे देणाऱ्यांना कुठूनही हुडकून काढू आणि त्यांच्यावर कारवाई करू, असे फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले. पीएफआयच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईबाबत ते म्हणाले की, पीएफआयवर कारवाई झाली. म्हणजे मोठ्या प्रमाणात या संदर्भातील पुरावे एनआयए, एटीएसकडे आणि केंद्र व राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वी केरळसारख्या (Keral) राज्यानेही पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता चौकशी सुरू आहे आणि अनेक गोष्टी त्यातून बाहेर येतील.

आपल्या देशात आतल्या आत अस्वस्थता निर्माण करण्याचं जे षड्यन्त्र सुरू होतं, त्या सगळ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर येणार आहेत. पूर्वाश्रमीचे भाजप आणि सद्यःस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांची भेट होणार आहे. याबाबत विचारले असता, ‘मला कल्पना नाही’, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अधिक बोलण्याचे टाळले.

Devendra Fadanvis
Devendra Fadnavis : बघा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

एटीएस आणि एनआयएच्या पथकाने पुण्यात कारवाई करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI)काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने निषेध आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल ६० ते ७० कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (PFI latest news) ताब्यात घेतल्यानंतर काही आंदोलनकर्त्यांनी यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे, संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेटकरी करीत आहेत.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी यावर नाराजी व्यक्त करीत संबंधितांना इशारा दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आशिष शेलार म्हणाले, पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांना ठेचून मारले पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com