Devendra Fadnavis News: विधिमंडळ सचिवालयाचं प्रशिक्षण घ्या, असं का म्हणाले फडणवीस ?

Budget Session: मागील अधिवेशनातील प्रश्‍न जसाच्या तसा या अधिवेशनात आला.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

Old Pension News: जुन्या पेंशनचा मुद्दा आज विधानपरिषदेच्या सभागृहात आज चांगलाच गाजला. विरोधी पक्षातील सदस्यांसह सत्ताधारी आमदारांनीही जुन्या पेंशनची मागणी केली. त्यावर सद्यःस्थितीत जुनी पेंशन योजना सद्यःस्थितीत लागू करता येणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हा प्रश्‍न जेव्हा सभागृहात आला, तेव्हा मागील अधिवेशनातील प्रश्‍न जसाच्या तसा या अधिवेशनात आला, असं म्हणत ही विधिमंडळ सचिवालयाची चूक आहे. त्यामुळे विधान मंडळ सचिवालयाचं प्रशिक्षण घ्या, अशी सूचना फडणवीसांनी केली. ते म्हणाले, असे होऊ नये, यासाठीच तारांकित प्रश्‍नाचे नियम कडक केले आहेत. त्याशिवाय ५० आयुधं दिलेली आहेत. म्हणून सदस्यांनी दुसरी आयुधं वापरली पाहिजे. (Fadanvis Said Take Training of the Legislature Secretariat)

जाहिरातींवर वारेमाप खर्च केला जातो, पण कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिली जात नाही, असा आरोप सभागृहात केला गेला. त्यावर फडणवीस म्हणाले, जाहिरातीचा खर्च पूर्णपणे बंद करून योजना देता येत असेल, तर जाहिराती बंद करतो आणि तो पैसा इकडे देतो. कारण हा भावनिक प्रश्‍न आहे. आमदारांच्या पेंशनवरही प्रश्‍न केले जातात. पण जाहिराती आणि आमदारांचे पेंशन रद्द करून १०० कर्मचाऱ्यांना तरी जुनी पेंशन आपण देऊ शकतो का, याचा विचार आधी केला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

आजच जुन्या पेंशनची घोषणा करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. आजच्या आज जरी घोषणा केली, तर या सरकारवर (Maharashtra Government) त्याचा काही परिणाम होणार नाही. हा परिणाम होण्याची सुरुवात २०२८ला होईल, २०३०मध्ये परिणाम गंभीर होईल. ही वास्तविकता आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. निवडणुकीशी संबंधित तर अजिबात नाही. एखादी निवडणूक आम्ही हरलो तरी काही फरक पडत नाही. कॉंग्रेस दोन निवडणुका हरली तरी भाई (भाई जगताप) (Bhai Jagtap) आज जोरदार लढत आहेत, असे फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

Devendra Fadanvis
Fadanvis : दोन-अडीच महिन्यात बहुतेक त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असावा !

आपला खर्च आज एकूण खर्चाच्या ५८ टक्क्यावर आधीच पोहोचलेला आहे. आता ६२ टक्क्यांच्या घरात चालला आहे. पुढच्या वर्षा ६८ टक्क्यांवर जाईल. त्यामुळे खर्चाचा ताळेबंद आधी बसवावा लागेल. २०२८ नंतर अडीच लाख कर्मचारी निवृत्त होतील. तेव्हापासून हा भार सरकारवर वाढणार आहे. तेव्हा ज्यांची कुणाची सरकार (Governent) असेल, त्यांच्यावर बोझा पडू नये, अशी आमची भूमिका आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com