Old Pension News: ‘ती’ राज्ये पाच ते सात वर्ष जुनी पेन्शन देतील, पुढे काय..?

Devendra Fadnavis News : राज्यांनी पुन्हा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेंशन लागू करण्याचा निर्णय घेतला.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

Devendra Fadanvis on Old Pension Scheme : सन २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत पुन्हा गाजला. राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, झारखंड या राज्यांनी जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय घेतला. याकडे सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

सदस्यांच्या प्रश्‍नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला खुलासा बरोबर असला आणि भूमिका सत्य असली तरी राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि झारखंड या राज्यांनी पुन्हा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेंशन लागू करण्याचा निर्णय घेतला. ही राज्ये आपल्यापेक्षा जास्त सक्षम नाहीत. पेंशनमध्ये सरकारचे १० टक्के कर्मचाऱ्यांचे १४ टक्के पैसे जमा असतात, असे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले.

फंड मॅनेजरकडे २४ टक्के रक्कम जमा होईल. ती शेअर बाजारात गुंतवण्याची मुभा आहे. पण हे धोकादायक आहे का आणि यामुळे काही नवीन प्रश्‍न उद्भवतील का, असे प्रश्‍न दावनेंनी उपस्थित केले. त्यावर फडणवीस म्हणाले, ज्या राज्यांनी जुनी पेंशन देण्याची घोषणा केली, ती राज्ये केंद्र सरकारला (Central Government) आणि फंड मॅनेजरला पैसे परत मागत आहे. या पैशांतून जुनी पेंशन देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नातून ते फार फार तर पाच ते सात वर्ष जुनी पेंशन देऊ शकणार. मग पुढे काय, असा प्रश्‍न फडणवीसांनी केला.

हे सांगताना मॉटेंकसिंग अहलुवालीया यांच्या अहवालाचा दाखला फडणवीसांनी (Devendra Fadanis) दिला. ते म्हणाले आता हा निर्णय घेणे म्हणजे पुढच्या सरकारवर बोझा टाकण्यासारखे आहे. जगातले सगळे पेंशन फंड मार्केट लिंक आहेत. बॅंकांमध्ये (Bank) ठेवी ठेवल्या तर चार टक्के परतावा मिळतो. इन्फ्लेशनचा रेट ७ टक्के आहे. महागाई ३ टक्के जास्त वाढली आहे. रिटर्न कॅपिटल मार्केटमध्ये जास्त मिळतात. जास्त रिटर्न घेण्याच्या मागेल लागलो, तर धोका आहे. त्या तुलनेत म्युच्युअल फंड ११ टक्के रिटर्न देतात, असे ते म्हणाले.

Devendra Fadanvis
Fadanvis : जुन्या पेंशनवर फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, ते आजच निवृत्त होत नाहीये..

काही रक्कम बॅंकांमध्ये आणि काही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता येईल. यामधून त्यांनी अधिक रिटर्न दिला पाहिजे. जगभरात ही पद्धत आहे. एलआयसी. एसबीआय मार्केटमध्ये पैसा लावते. कारण त्यांना नफा जमा करावा लागतो. यामध्ये एसबीआयचे म्युच्युअल फंड सुरक्षित आहेत. या बाबीवर विचार केला जाऊ शकतो, असेही फडणवीसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com