Fadanvis : ‘ही’ योजना फसवी तर नाही ना, म्हणून काही महिला प्रवास करून बघत आहेत...

Narendra Modi : हंडामुक्त समाज करण्याचे काम मोदींच्या नेतृत्वात होत आहे.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

Nagpur Devendra Fadanvis News : देशाला स्वातंत्र्य मिळून १९ कोटी जनतेपैकी फक्त ३ कोटी जनतेच्या घरी नळ होते. महिलांना या त्रासापासून मुक्त करण्यासाठी २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळ पोहचविण्याचा निर्धार सरकारने केला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Only 3 crore people had water taps in their homes)

आपण वर्षानुवर्षे हंडामुक्त समाज करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र आता हंडामुक्त समाज करण्याचे काम मोदींच्या नेतृत्वात होत आहे. नागपूर जिल्हा परिषदेचा निधी थांबवून ठेवल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. पण असे अजिबात नाहीये. महिला बालकल्याण, शिक्षण सगळ्या कामांवरील स्थगिती उठविली आहे. काही कामांवर स्थगिती आहे, पण भेदभाव होणार नाही. जिल्ह्यातील कुठलीही कामे थांबणार नाही. शेवटी जिल्हा आपला आहे, असे फडणवीस म्हणाले.

जिल्हा परिषद अध्यक्षांनी हे काम चांगल्या पद्धतीने करण्याची व्यक्त केली, ते चांगल्या पद्धतीने होईल. जिल्ह्यातील सर्व योजना सोलरवर आणल्या जातील. त्यासाठी निधीला मी मंजुरी देतो. ८ हजार शेतकऱ्यांना वीज द्यावी लागते. ही वीज सोलर फिडरवरून देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.

फिडरच्या जवळपास सरकारी जमीन शोधावी किंवा आपण आपली पडीक जमीन कोणी देणार असेल तर सरकार त्यांना वर्षाला ७५ हजार रुपये भाडं देईल आणि ही जमीन शेतकऱ्यांचीच राहिले. सोलरवर शेतकऱ्यांना वीज देणारा नागपूर हा पहिला जिल्हा आपल्याला करायचा आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.

आतापर्यंत ६५ मिलिमीटर पाऊस झाला तरच नुकसानभरपाई मिळायची, मात्र आता आपण सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली आहे. महाराष्ट्रात हे पहिल्यांदा झालं आहे. एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट दराने आपण नुकसान भरपाई देणार आहो.

Devendra Fadanvis
Fadanvis : फडणवीस म्हणाले, तोडगा निघाला म्हणून तर बसेस गेल्यात ना…

महिलांना एसटीच्या तिकिटात ५० टक्के सूट दिल्यामुळे एसटीत महिलांची गर्दी ओसंडून वाहत आहे. काही महिला तर ही योजना फसवी तर नाही ना, म्हणून एसटीचा प्रवास करून बघत आहेत, असे फडणवीसांनी सांगितले.

मी अर्थमंत्री आहे, या बजेटमध्ये लक्षात आलं की नागपूरला काय काय मिळालं आहे. त्यामुळं जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी राजकारण न करता जिल्ह्याचा विकास कसा होईल, यासाठी मदत आणि प्रयत्न करावे, असा सल्ला फडणवीसांनी दिला.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासमोर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी तक्रारींचा पाढाच वाचला. आज होणाऱ्या कार्यक्रमाची पत्रिका मला काल रात्री ८ वाजता मिळाली. पत्रिका योग्य वेळी मिळाली असती तर यापेक्षा चांगला भूमिपूजन सोहळा आयोजित केला असता, असे मुक्ता कोकड्डे यांनी सांगितले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे (Farmers) नुकसान झाले असून त्यांना मदत करण्यात यावी. जिल्हा परिषदेच्या (ZP) काही कामांना आपण स्थगिती दिली आहे. त्याची स्थगिती उठवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com