Fadanvis : फडणवीस म्हणाले, तोडगा निघाला म्हणून तर बसेस गेल्यात ना…

Farmers : ढोल ताशांच्या गजरात नाचून मिरवणूक काढण्यात आली.
Devendra Fadanvis and Nana Patole
Devendra Fadanvis and Nana PatoleSarkarnama

Nagpur Devendra Fadanvis on Nana Patole News : सध्या राज्यभर एकच मुद्दा तापला आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांचा. यावर तोडगा काढण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान संप मिटल्याच्या बातम्याही पसरल्या. पण निश्‍चित काहीही कुणीही काही बोलले नव्हते. पण संपकऱ्यांना परत आणण्यासाठी बसेस गेलेल्या असल्याचे सांगण्यात आले. (Farmers' agitation has stopped.)

यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता. ‘तोडगा निघाला म्हणून तर बसेस गेल्यात ना...’, असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे संपूर्ण राज्याचे टेंशन वाढविणार शेतकऱ्यांचे आंदोलन थांबले आहे. याचा आनंद शेतकऱ्यांनी आज शहरातील सिव्हिल लाइन्स येथे साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात नाचून मिरवणूक काढण्यात आली.

जी-२० परिषदेसाठी विदेशी पाहुण्यांचे उद्या शहरात आगमन होत आहे. त्याबद्दल विचारले असता, मी प्रशासनाचं अभिनंदन करतो, जी-२०च्या निमित्ताने अतिशय चांगली तयारी त्यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनीसुद्धा त्यात चांगली मेहनत घेतली आहे. त्यामुळे आलेल्या लोकांना नागपूरचं वैभव बघायला मिळणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बघायला मिळेल आणि आपण त्यांचं उत्तम स्वागत करू, असे फडणवीस म्हणाले.

ही जी मंडळी येते आहे, हे त्या - त्या देशामध्ये आपल्या शहराचं नाव घेऊन जातात आणि आत्तापर्यंत मुंबई आणि छत्रपती संभाजी नगर आणि पुणे या ठिकाणी ज्या काही बैठका झाल्या, त्याचे अतिशय चांगले रिपोर्ट जगभरात गेले. त्यामुळे तसेच रिपोर्ट नागपूरचेसुद्धा गेले पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी आम्ही सगळे उत्साही आहोत.

Devendra Fadanvis and Nana Patole
Fadanvis : गुन्हा दाखल असतानाही सावकाराने वसूल केले १४ लाख; त्यावर फडणवीस म्हणाले...

सिव्हिल सोसायटीची ही एंगेजमेंट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजसेवी वेगवेगळ्या देशांतील संस्थांचे प्रतिनिधी येणार आहेत. त्यामुळे समाजोपयोगी ठराव त्यात होतील. याचे फायदे भविष्यात आपल्याला दिसणार आहेत. या परिषदेसाठी नागपूरकरांमध्ये (Nagpur) उत्साह बघायला मिळतो आहे. ही परिषद यशस्वी करणे, हे प्रत्येक नागपूरकराचे कर्तव्य असल्याचे फडणवीस म्हणाले.

नानांची तक्रार पोहोचली नाही..

धीरज शास्त्री महाराजांचा कार्यक्रम मुंबईत होते. हा कार्यक्रमाला मंजुरी देऊ नये, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे. याबाबत फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, यासंदर्भातली कुठलीही तक्रार मला मिळाली नाही. नाना पटोले यांनी काय म्हटलं ते माझ्यापर्यंत अद्याप पोहोचलेलं नाही. जेव्हा तक्रार येईल, तेव्हा बघू काय करायचे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com