Fadanvis : फडणवीसांचा शायराना अंदाज; म्हणाले, बात निकली है, तो दूर तक जाएगी...

Gondia : मी येथे आलो आहे, आपणही आहात. त्यामुळे चर्चा तर होणारच.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

Gondia Devendra Fadanvis News : मराठीतून मेडिकल, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निकचे शिक्षण मराठीतून सुरू करणार आहे. यामुळे इंग्रजीमध्ये कमजोर असलेले विद्यार्थी आता हे उच्च आणि तंत्रशिक्षण घेऊ शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे.

सज्जन जिंदल यांनी विदर्भात गुंतवणूक करावी. कारण आम्ही विदर्भाला स्टील हब बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा विदर्भाला मोठा लाभ होणार आहे. ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा आम्ही उपलब्ध करीत आहोत. त्यामध्ये समृद्धी महामार्ग आम्ही आता गोंदियापर्यंत आणत आहोत. सोबतच गडचिरोलीपर्यंत हा मार्ग आम्ही नेणार आहोत. भंडारा, गोंदिया, चद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याची कनेक्टीवीटी आमही तयार करत आहोत, असे फडणवीसांनी सांगितली.

खासदार प्रफुल्ल पटेल यांचे वडील स्व. मनोहरभाई पटेल यांची आज ११७वी जयंती आहे. त्यानिमित्त गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार प्रफुल्ल पटेल, स्टील उद्योजक सज्जन जिंदल, अभिनेते जॅकी श्रॉफ, माजी आमदार प्रकाश गजभिये, डॉ. परिणय फुके, आमदार अभिजित वंजारी, आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल आदी होते.

पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमधील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही लॉजिस्टीक कॉरीडोर तयार करत आहोत. धानाला बोनस देण्यासोबतच त्याची पद्धतही आम्ही बदलली आहे. आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आम्ही बोनसची रक्कम जमा करत आहो. आम्ही तयार करत असलेली इकोसिस्टीम शेतकऱ्यांना थेट आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यांकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis
ही वेळ चुका काढण्याची नव्हे, तर संकटाशी लढण्याची : प्रफुल्ल पटेल 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी आज मला स्व. मनोहरभाई पटेल यांना आदरांजली अर्पण करण्याची संधी मला दिली. त्यांनी निमंत्रण दिले आणि मी आलो. आता मी येथे आलो आहे, आपणही आहात. त्यामुळे चर्चा तर होणारच. ‘बात निकली है, तो दूर तक जाएगी’. नागपूर, लातूर पर्यंतही चर्चा होणारच आहे. पण त्याची चिंता करण्याची गरज नाही. कारण महाराष्ट्राची संस्कृती फार वेगळी आणि चांगली आहे.

राजकारण करताना आम्ही लोक विचारांनी वेगळे असतो. आम्ही लोक विचारांचे विरोधक असतो, व्यक्तींचे विरोधक नसतो. राजकारणात, (Politics) निवडणुकांमध्ये (Elections) आपण एकमेकांच्या विरोधात असतो. पण आपण एकत्र बसून चहा पितो. एका मंचावर आपण येतो. ही आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीच विशेषतः आहे. ही संस्कृती आपल्यासोबत आहे. त्यामुळे आपल्याला आणि महाराष्ट्राच्या विकासाला कुणीही थांबवू शकत नाही, असे फडणवीस (Devendra Fadanis) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com