बंदी घालून कट्टरता नष्ट करता येत नाही, पण भाजप कट्टरता वाढवत आहे !

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार कॉम्रेड वृंदा करात या अमरावती (Amravati) जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या धारणी येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
Vrunda Kharat at Amravati Disrtist.
Vrunda Kharat at Amravati Disrtist.Sarkarnama

तिवसा (जि. अमरावती) ः बंदी घालून कट्टरता नष्ट केली जाऊ शकत नाही. त्यासाठी कठोर कायदे व त्याची निष्पक्षपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. भाजपची (BJP) नियत, नीती खराब असून भाजप फक्त हिंदू कट्टरपंथीला वाव देत आहे. अशा परखड शब्दांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या कॉम्रेड वृंदा करात यांनी भाजपवर तोफ डागली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरो सदस्य तथा माजी खासदार कॉम्रेड वृंदा करात या अमरावती (Amravati) जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या धारणी येथे जाहीर सभेला संबोधित करणार असून आदिवासी लोकांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान काल रात्री ८.३० वाजता त्यांचे तिवसा येथे माकपच्या पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना पीएफआयवर (PFI) करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी पीएफआय फक्त ॲन्टी कम्युनिस्ट नसून सीपीएमला टार्गेट करण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या.

त्यांचे विचार उग्र असून काम हिंसात्मक आहे. परंतु आम्ही असे म्हणतो की, या उग्र विचारधारांच्या संस्थांमध्ये सनातन धर्म, जनजागृती संस्था यांचाही समावेश होत असून त्या मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्यामुळे बंदी घालून देशातील कट्टरता नष्ट केली जाऊ शकत नाही. भाजपची नियत, नीती ही चुकीची असल्यामुळे देशात कट्टरपंथी ताकत वाढत आहे. आम्ही त्यांच्या विरोधात आहोत, असे खरात यांनी सांगितले.

Vrunda Kharat at Amravati Disrtist.
मोदींची बुलडोजर नीती देशाच्या एकात्मतेला घातक...वृंदा करात

कॉग्रेसच्या राष्ट्रीय सेवा संघावर बंदी घालण्याच्या मागणी संदर्भात त्यांना विचारले असता, आम्ही बंदी घालण्याच्या समर्थनात नाही. मात्र भाजप हे फक्त आणि फक्त हिंदूंच्या मतांसाठी राजकारण करत असून ते कट्टरपंथीयांना चालना देत आहेत. ही बाब देशहिथार्थ नाही. त्यामुळे कुठल्याही संस्थांवर बंदी घालून कट्टरता नष्ट केली जाऊ शकत नाही. त्यासाठी कठोर कायदे व त्याची निष्पक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असेही कॉम्रेड वृंदा खरात यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com