काळ्या पैशातून ‘भारत जोडो’चा खर्च; बावनकुळे केंद्रीय तपास यंत्रणांना पत्र लिहिणार...

‘भारत जोडो’ यात्रेच्या खर्चासंदर्भात चौकशी करण्यासाठी आपण राज्याच्या आणि केंद्राच्या तपास यंत्रणांना तपास यंत्रणांना पत्र लिहिणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा खर्च महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी कमावलेल्या काळ्या पैशातून केला जातोय, असा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ‘भारत जोडो’ यात्रेच्या खर्चासंदर्भात चौकशी करण्यासाठी आपण राज्याच्या आणि केंद्राच्या तपास यंत्रणांना तपास यंत्रणांना पत्र लिहिणार असल्याचे भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यात्रा काँग्रेसच्या (Congress) नेत्यांच्या मुला मुलींना लॉन्च करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे का, असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षांतील कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये जाण्याऐवजी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, असे मत आमदार बावनकुळे यांनी व्यक्त केले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर त्या पक्षातील नेत्यांचा कब्जा आहे. ते कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांना भेटू देत नाहीत. परिणामी या यात्रेमुळे त्यांचा पक्ष वाढण्याऐवजी कमकुवत होत आहे. अन्य पक्षांतील नेते कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत नाहीत. उलट काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नंदुरबारच्या काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला. २०२४ ची आगामी निवडणूक येईपर्यंत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये आलेले दिसतील.

भारत जोडो यात्रा ही काँग्रेसच्या काही नेत्यांनी हायजॅक केली असं कार्यकर्त्यांना वाटत आहे. अशोक चव्हाण आपल्या पोरीला प्रमोट करत आहेत. राहुल गांधींनी काढलेल्या यात्रेत नेत्यांचे पोरं पुढे येत आहेत, असा संदेश त्यांच्या पक्षात गेला आहे. त्यामुळे काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही काँग्रेसच्या मूळ कार्यकर्त्याच्या काही कामाची नाही. रोज काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. अब्दुल सत्तार प्रकरणाबद्दल विचारले असता, कोणावरही आक्षेपार्ह बोलू नये, राजकारणात काही गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजे. मुख्यमंत्री या प्रकरणात लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे.

Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काय कारेमोरेजी... तुमच्या चेहऱ्यावर काही भाव दिसत नाहीये !

राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणाचा मोठ्या प्रमाणावर जन आक्रोश करत आहे परंतु यापूर्वीची पार्श्वभूमी बघितली तर महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार असताना यापेक्षाही आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. कधी मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले. जेलमध्ये असलेले संजय राऊत यांनी अनेकदा आक्षेप वक्तव्य केले आहे. त्यामुळे सर्वांनीच हे पाळलं पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातसुद्धा महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलू नका, असे आम्ही सांगायचो. अब्दुल सत्तार यांनी केलेले विधान मान्य नाहीच, पण यानंतर असं विधान कोणीच करणार नाही याचे भान ठेवावे, असे बावनकुळे म्हणाले.

'तो' भाऊ-बहिणीचा, परिवाराचा प्रश्‍न..

अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळेंचा येवढा मोठा अपमान केला, तरीही अजित पवार शांत का, या प्रश्‍नावर आमदार बावनकुळे म्हणाले, त्यांचा तो भाऊ बहिणीचा आणि परिवाराचा प्रश्न आहे. त्यामुळे अजित दादा कोणत्या वेळी कोणती भूमिका घेतील. याबद्दल काही नेम नसतो, त्यांच्या भूमिकेचा अंदाज व्यक्त करता येत नाही, कधी कधी आज आपल्याला वाटतं अजित पवार असं करतील परंतु ते तसं करत नाही. अजित पवार काहीही करू शकतात. २०२४ पर्यंत महाविकास आघाडीमधले अनेक आश्चर्यजनक प्रवेशाचे बॉम्ब आम्ही फोडणार आहोत. मीडिया पण आश्चर्य व्यक्त करेल की असं झालं कसं? त्यामुळे २०२४ ची वाट बघा. या दीड वर्षात रोज रोज ता त्या जिल्ह्यात, भागातले नेते भारतीय जनता पक्षामध्ये, कधी शिंदे गटात तर कधी भाजपमध्ये प्रवेश करतील, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in