अखेर चरण वाघमारे ठरणार गेम चेंजर; सरकारनामाचे भाकीत खरे ठरले...

आज भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपला परंपरागत मित्र काँग्रेसला डावलून भाजप सोबत ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ केला आहे.
Charan Waghmare and Nana Patole Bhandara
Charan Waghmare and Nana Patole BhandaraSarkarnama

भंडारा : भंडारा जिल्हा परिषदेबाबत ‘सरकारनामा’चे भाकीत जवळपास खरे ठरले असून अखेर चरण वाघमारे जिल्हा परिषदेत गेम चेंजर ठरणार आहेत. 10 में रोजी होणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेसला सत्ता स्थापनेसाठी भाजपमधील चरण वाघमारेंचा गट मदत करणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे भंडारा भाजपला आपसातील गटबाजी 100 टक्के भोवलीे, असे म्हणता येईल.

आज भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समितीमध्ये (Panchayat Samiti) राष्ट्रवादी काँग्रेसने आपला परंपरागत मित्र काँग्रेसला डावलून भाजपसोबत (BJP) ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ केला आहे. मागे काँग्रेसला मदत करूनही सभापतिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी पक्ष नाराज होता. त्याचाच वचपा राष्ट्रवादीने पंचायत समिती सभापती निवडणुकीत काढत आता 10 मे रोजी भंडारा भाजपमधील डॉ. परिणय फुके गट व मेंढे गट राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत भंडारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार यांची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या डॉ. फुके आणि खासदार मेंढे गटांना तुमसर पंचायत समितीमध्ये माजी आमदार चरण वाघमारे यांना डिवचणे चांगलेच महागात पडले आहे.

तुमसर पंचायत समितीमध्ये भाजपचे १० सदस्य असताना चरण वाघमारे यांच्या गटाने नंदू रहांगडाले यांचे सभापतीसाठी व डॉ. फुके गटाने लक्ष्मीकांत सेलोकर यांचे नाव पुढे केले होते. मोहाडीप्रमाणे परत दगा फटका लक्षात घेता चरण वाघमारे यांनी लागलीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मदत घेत आपल्या पदरात सभापतिपद पाडून घेतले. दुसरीकडे आपली पडती बाजू लक्षात घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही येत्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडून होणारा दगा फटका लक्षात घेता चरण वाघमारे मदत करतील, ही अपेक्षा करत त्यांनी पंचायत समितीत चरण वाघमारे यांना मदत केली.

Charan Waghmare and Nana Patole Bhandara
पंचायत समिती : राष्ट्रवादीने मोहाडीत गड जिंकला, मात्र सिंह गमावला...

भविष्यात माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील ५ व अपक्ष ५, असे ६ जिल्हा परिषद सदस्य सत्तेपासून सहा हात दूर असलेल्या काँग्रेसला मदत करणार, हे जवळपास निश्‍चित झाले असून अखेर चरण वाघमारे जिल्हा परिषदेत गेम चेंजर ठरणार हे ‘सरकारनामा’चे भाकीत खरे ठरणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत काँग्रेस चे २१ सदस्य व चरण वाघमारे यांचे ६ सदस्य येत्या १० मे च्या जिल्हा परिषदेत सत्तेचा झेंडा रोवणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे, तर सत्तेचे स्वप्न पाहणारे राष्ट्रवादी व भाजपच्या उरलेल्या गटांचे स्वप्न भंग होणार, हे सुद्धा ठरल्यासारखेच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com