Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

''...तरीही ग्रामपंचायत निकालात भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार!'' फडणवीसांचा आत्मविश्वास

Devendra Fadnavis On Gram panchayat Results: पुन्हा एकदा जनता आपल्या पाठीशी उभी राहणार, भाजपला रेकॉर्ड ब्रेक जागा मिळणार...

Devendra Fadnavis On Gram panchayat Results: '' मागच्या वेळेस आम्ही आमच्या एवढ्या ग्रामपंचायती आल्याचं सांगितलं होतं. यावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र, त्यानंतर आमच्या बावनकुळेंनी ग्रामपंचायतींच्या नावासहीत यादी घोषित केली. त्यामुळे काही काळजी करु नका पुन्हा एकदा जनता आपल्या पाठीशी उभी राहणार असून ब्रेक जागा मिळतील आणि भाजपच राज्यात एक नंबरचा पक्ष म्हणून पुढे येईल'' असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले,भाजपाचा उद्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. तुम्ही लिहून घ्या की, महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील. कोणी काहीही नरेटिव्ह सेट केलं तरी आपल्याला रेकॉर्ड ब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका.

Devendra Fadnavis
Gram Panchayat Election : पंढरपुरात ११ पैकी ७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व; पुळूजवाडीत महाडिकांना धक्का, परिचारकांची बाजी

राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांना महत्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आजच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. आज थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहेत.

Devendra Fadnavis
राज्यातील गायरान अतिक्रमणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; दिला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भाजप, शिंदे गटासह महाविकास आघाडीच्याही दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारराजा नेमका कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार तर कुणाला पराभवाचा धक्का देणार हे काही तासांत स्पष्ट होणार आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट, भाजप ठाकरे गट अशा थेट लढती झाल्या असल्यामुळे निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयासाठी कंबर कसली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com