नागपूरकरातही भिडे गुरूजींचा निषेध, महिला म्हणतात ‘ते’ आमचे वैयक्तिक स्वातंत्र्य...

मंत्रालयात संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरूजी (Bhide Guruji) काही कामानिमित्त (Mantralaya) गेले होते. दरम्यान साम टीव्ही या मराठी वृत्त वाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अपमान केला.
Sambhaji Bhide
Sambhaji BhideSarkarnama

नागपूर : सातत्याने वादग्रस्त विधान करत आलेले भिडे गुरूजी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बुधवारी कामानिमित्त ते मुंबईला (Mumbai) मंत्रालयात आले होते. तेव्हा साम टीव्ही या वृत्त वाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी उद्धटपणे बोलत त्यांचा अपमान केला.

संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरूजी (Bhide Guruji) काही कामानिमित्त मंत्रालयात (Mantralaya) गेले होते. दरम्यान साम टीव्ही या मराठी वृत्त वाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो, असे म्हणत त्यांनी त्यांचा अपमान केला. भिडे गुरूजी मंत्रालयात आले असता गुरूजी आज तुम्ही मंत्रालयात आला आहात. आज आपण कुणाची भेट घेतली, असे महिला पत्रकाराने विचारताच, ‘आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलीन’, असे भिडे गुरूजी महिला पत्रकाराला म्हणत चारचौघांत त्यांचा अपमान केला.

देशात स्त्रीला शक्तीचे स्वरूप म्हणून पुजले जाते. तर, त्यातीलच काही लोक पेहरावावरून तिचे चारित्र्य ठरवतात. त्यामुळे, महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नेहमी प्रश्नचिन्ह उभा राहतो. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी ‘साम’ टीव्हीच्या महिला प्रतिनिधीला टिकलीवरून केलेल्या विधानाने पुन्हा वाद निर्माण झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भिडे यांच्या या वक्तव्याच्या निषेध करण्यात येत आहे. याचे पडसाद गुरुवारी नागपूरमध्येही उमटले. सोशल मीडियावर पोस्ट करीत विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली.

भिडे आपल्या घराण्यात विधवा नातेवाईक महिलांशी बोलत नाही काय? कुंकू लावणे याचा सौभाग्याशी काही संबंध नाही. लहान-लहान मुली टिकल्या लावतात. त्यांचे काय लग्न झालेले असते? या काळात यजमान वारल्यावर ही टिकल्या लावणाऱ्या आणि ते हयात असताना न लावणाऱ्या ही अनेक मुली आहेत. ‘कुंकू म्हणजे सधवा’ हे समीकरण आता खूप मागे पडले.

-अरुणा सबाने, साहित्यिक.

भारतीय संविधानातील अनुच्छेद १९ ते २२ नुसार व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकार सर्वोच्च आहे. संविधान आहे तोपर्यंत भारतीय स्त्रियांचे स्वातंत्र्य अबाधित आहे व राहणार. कोण काय बरळत याने काही फरक पडत नाही. ज्या महिला पत्रकाराचा संभाजी भिडे यांनी अपमान केला त्यांची जाहीर माफी मागावी, माझे म्हणणे फक्त एवढेच आहे. पत्रकारांनी हा त्यांचा वैयक्तिक अपमान समजून संभाजी भिडे यांना कुठल्याही प्रसार माध्यमावर पुन्हा प्रसिद्धी मिळणार नाही, याची काळजी घ्यावी.

-ॲड. समीक्षा गणेशे.

Sambhaji Bhide
भिडे गुरूजी म्हणाले; औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या इस्लामच्या पोटतिडकिने केली

संभाजी भिडेंचे वक्तव्य ऐकून देशात संविधानिक मूल्यांना जाणून तिलांजली दिली जाते असे वाटते. टिकली लावणे, न लावणे हा प्रत्येक स्त्रीचा ऐच्छिक अधिकार आहे. संविधान विरोधी विचार असणाऱ्या लोकांकडून महिला पत्रकाराचा अपमान करणाऱ्यांचा आम्ही महिला कडाडून निषेध करतो.

-रंजना सुरजुसे, समाजसेविका.

‘स्त्री’ने टिकली लावणे अथवा न लावणे, हा ‘ती’चा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर पुरुषांनी असे व्यभिचारी भाष्य करणे चुकीचे आहे.

-मंगला महाजन, समाजसेविका.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in