बंडखोर आज जिंकलेही, तरी हा त्यांचा क्षणिक विजय; अन् भविष्यातला पराभव !

महाराष्ट्राबद्दल राज्यपालांचा (Governor) प्रामाणिकपणा, त्यांची निष्ठा तमाम जनतेला दिसून आली. बंडखोरांना वाटत आहे की, ते जिंकले, पण तसे नाही.
MLA Nitin Deshmukh on Governor
MLA Nitin Deshmukh on GovernorSarkarnama

नागपूर : जसे भारतीय जनता पक्ष सांगेल, तसे राज्यपाल नाचतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा विश्‍वास राज्यपालांवरून उडालेला आहे. आता न्यायालय तरी न्याय देईल, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. एकीकडे १६ आमदारांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत एकदम उद्याच्या उद्याच अधिवेशन घेण्यापेक्षा १० दिवस उशिरा घेतलं असतं तर काय फरक पडला असता, असा सवाल आमदार नितीन देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राबद्दल (Maharashtra) राज्यपालांचा (Governor) प्रामाणिकपणा, त्यांची निष्ठा तमाम जनतेला दिसून आली. बंडखोरांना वाटत आहे की, ते जिंकले. अन् समजा जिंकलेही, तरीही हा विजय क्षणिक आहे. त्यांचा आजचा विजय हा भविष्यातील पराभव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्या आमदारांना सोडले, वर्षा बंगला सोडला, पण अद्याप शरद पवारांना नाही सोडले, या गुलाबराव पाटलांच्या (Gulabrao Patil) वक्तव्याबाबत विचारले असता आमदार देशमुख म्हणाले, हा गुलाबराव पाटलांचा सूर नाही, तर त्यांच्या गळ्यातून भाजप बोलते आहे. गुलाबरावांवर मोठा दबाव असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

गुवाहाटीवरून परत आलेले बंडखोर आमदार बहुमत चाचणीसाठी जेव्हा उद्या सभागृहात येतील, तेव्हा त्यांचे मत बदललेले असेल. सध्या ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे, पण महाराष्ट्र या संतांच्या भूमीत ते पाय ठेवतील, तेव्हा निश्‍चितपणे त्यांचे विचार बदललेले असतील आणि ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे झालेले दिसतील, असा विश्‍वास आमदार देशमुख यांनी व्यक्त केला. आपल्या राज्यातील संतांची विचारधारा, बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा याचा परिणाम त्यांच्या मनावर होईल आणि त्यांचे मतपरिवर्तन होऊन ते सत्याच्या बाजूने उभे राहतील, असेही ते म्हणाले.

MLA Nitin Deshmukh on Governor
video : नितीन देशमुख यांनी कथन केला गुजरात येथील अनुभव

अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे पहिल्या फेरीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर तेथून ते धाडसाने परत आले आणि आपण शिवसेनेचे निष्ठावान आहोत, असे ते सांगत आहेत. आजही त्यांना विश्‍वास आहे की, या सर्व प्रक्रियेमध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार तरेल आणि आपला कार्यकाळ पूर्ण करेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in