Narendra Modi : येण्यापूर्वीच नरेंद्र मोदींनी नागपूरकरांना दिली ‘ही’ भेट...

Nagpur Metro News: शहराला ग्रामीण भागाशी जोडणाऱ्या महत्वाकांक्षी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Second Phase of Nagpur Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ११ डिसेंबरला नागपुरात येत आहेत. या दौऱ्यात ते समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण करणार आहेत. पण नागपुरात येण्यापूर्वीच त्यांनी नागपूरकरांना खूष करून टाकले. मेट्रो टप्पा २ प्रकल्प व नाग नदी संवर्धन, सौंदर्यीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी भरीव निधी मंजूर केला आहे.

शहराला ग्रामीण भागाशी जोडणाऱ्या महत्वाकांक्षी मेट्रोच्या (Metro) दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे आता कन्हान, बुटीबोरी, कापसी, हिंगण्यापर्यंत मेट्रोचा मार्ग मोकळा झाला. मागील वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitaraman) यांनी या प्रकल्पासाठी ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. नागपूरची (Nagpur) वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीच्या आवश्यकतेचा विचार करून शहरातील मेट्रो वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील ४८.२९ किलोमीटरच्या मार्गास बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

राज्य सरकारने २०१९ मध्ये या प्रकल्पासाठी ११ हजार २३९ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता दिली आहे. आता केंद्राच्या मंजुरीनंतर मिहान ते एमआयडीसी इएसआर, ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी, लोकमान्यनगर ते हिंगणा, प्रजापतीनगर ते कापसीपर्यंत मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रोचा दुसरा टप्पा ४३.८ किलोमीटरचा असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाची एकूण लांबी ८२ किमी असेल. शहर व ग्रामीण भागाला जोडण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून १० लाखांवर नागरिकांना या टप्प्याचा फायदा होणार आहे.

कामठीपर्यंत सहज नागरिकांना जाता येणार आहे. कामठी मोठे शहर असून हजारो रहिवासी नोकरी आणि शिक्षणासाठी नागपूरला येतात. ते मेट्रोचा वापर करून नागपूरच्या कानाकोपऱ्यात जलद पोहोचू शकणार आहेत. बुटीबोरी एमआयडीसी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. येथे सुमारे ७५० युनिट्स असून सुमारे ५०,००० लोकांना रोजगार मिळत आहे. या नागरिकांना कारखान्यांपर्यंत जलद प्रवासाची सुविधा होणार आहे.

Narendra Modi
संत्र्याप्रमाणे नागपूर मेट्रो जगप्रसिद्ध होईल - नरेंद्र मोदी

असा आहे प्रकल्प..

एकूण किमी ः ४३.८

एकूण स्टेशन ः ३०

प्रकल्प किंमत ः ६,७०८ कोटी

असा होईल विस्तार..

- मिहान ते बुटीबोरी ः १८.६ किमी

- ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान ः १३.० किमी

- प्रजापतीनगर ते कापसी ः ५.५ किमी

- लोकमान्यनगर ते हिंगणा-ः ६.७ किमी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com