बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून पळवापळवीच्या धाकाने युवा सेनेकडून नियुक्त्यांवर भर !

नागपुरात (Nagpur) शिंदे सेनेमार्फत कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू असताना युवा सेनेने (Yuva Sena) तातडीने कार्यकारिणी घोषित करून शरद सरोदे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
Shivsena Nagpur
Shivsena NagpurSarkarnama

नागपूर : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद सुरू असताना न्यायालयाने मूळ शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवून शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला ढाल तलवार आणि शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल हे चिन्ह दिले. तेव्हापासून बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून उद्धव (Uddhav Thackeray) सेनेच्या कार्यकर्त्यांची पळवापळवी केली जात आहे. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा धडाका लावला आहे.

नागपुरात (Nagpur) शिंदे सेनेमार्फत कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू असताना युवा सेनेने (Yuva Sena) तातडीने कार्यकारिणी घोषित करून शरद सरोदे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सरोदे भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. शिंदे (Eknath Shinde) सेनेमार्फत त्यांना ऑफर देण्यात आली होती असे समजते. त्यांच्याकडे उत्तर, मध्य व पूर्व नागपूर विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी जिल्हाप्रमुख(District Chief) हितेश यादव यांना बढती देऊन प्रदेश सहसचिव करण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांना गोंदिया जिल्ह्याचे विस्तारक करण्यात आले आहे.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युवासेना काम करते. आदित्य ठाकरे यांनी आपले सहकारी वरुण सरदेसाई यांच्या माध्यमातून युवा सेनेला नागपूर विभागात सक्रिय केले आहे. काही महिन्यांपूर्वी वाडी नगर परिषदेचे सभापती हर्षल काकडे यांना पूर्व विदर्भ युवासेना संपर्क प्रमुख नियुक्त करण्यात आले आहे. राज्यात शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एकनाथ शिंदे यांची सेना नव्याने सक्रिय झाली आहे. सध्या या तीनही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. शहर युवा सेनेचे कार्यकारिणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती.

Shivsena Nagpur
उद्धव ठाकरेंनी टाकला मोठा डाव; राठोडांना करणार चितपट?

शरद सरोदे यांची जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याने उर्वरित नवीन कार्यकारिणी लवकरच घोषित केली जाणर आहे. रामटेक विधानसभेचे आकाश इंगोले यांच्याकडे हिंगणा, काटोल व सावनेर विधानसभा मतदार संघाची तर गौरव नागपूरे यास जिल्हा समन्वयक रामटेक विधानसभेत नियुक्त करण्यात आले आहे. अमित घाडगे जिल्हा समन्वयक नागपूर लोकसभा व सारंग नाकाडे यास उपजिला युवा अधिकारी पश्चिम नागपूर, सोनूसिंह उपजिला युवा अधिकारी उत्तर नागपूर नियुक्त करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in