आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात वीज चोरी, संजय राऊतांच्या कार्यक्रमातही चोरली होती वीज!

या कार्यक्रमाला युवासेना प्रमुख व माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उपस्थित होते. या कार्यक्रमात वीज चोरी झाल्याचे व त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर झाला.
Aditya Thackeray and Sanjay Raut
Aditya Thackeray and Sanjay RautSarkarnama

नागपूर : शिवसेनेच्यावतीने न्यू सुभेदार ले-आऊटमध्ये शनिवारी तान्हा पोळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला युवासेना प्रमुख व माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात वीज चोरी झाल्याचे व त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने महावितरणने दंडात्मक कारवाई करून मंडप डेकोरेशन कंत्राटदाराकडून ९ हजार ७६० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. कार्यक्रमासाठी व्यासपीठामागील विजेच्या खांबावरून वीज चोरी केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. विजेच्या दोन खांबा दरम्यानच्या तारांवर आकोडे टाकून वीज घेण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे. या कार्यक्रमाला पोलिस (Police) यंत्रणापासून प्रशासकीय यंत्रणा सतर्क होती. तरी सुद्धा वीज चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. व्हिडिओ वायरल झाल्या नंतर महावितरण खळबळून जागे झाले.

या प्रकरणी मंडप डेकोरेशन कंत्राटदार मनोहर बांते याच्यावर दंडात्मक कारवाई करून ९ हजार ७६० रुपयांचा दंड वसूल केला. काही महिन्यांपूर्वी नागपुरातील (Nagpur) गजानन नगर परिसरात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची सभा झाली होती. तेव्हाही सभेसाठी जवळच्या खांबावरून वीज चोरल्याचे उघड झाले होते. त्यानंतर महावितरणने आयोजकांवर सुद्धा दंडही ठोठावला होता. राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये तारांवर आकोडे टाकून सर्रास वीज चोरली जाते. आता हा प्रकार उघडकीस आला म्हणून संबंधित चोरट्यावर दंड ठोठावण्यात आला. नाहीतर वीज चोरी करून लोक मोकळे फिरत असतात.

अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरणने एक यंत्रणा उभारण्याची गरज आहे. एक चमू तयार करून शहरभर, गावागावांत गस्त घातली पाहिजे. ठिकठिकाणी काहींच्या नियुक्त्या केल्या पाहिजे किंवा जे लोक वीज चोरी निदर्शनास आणून देतील, त्यांना विभागातर्फे बक्षीस देण्याची योजना राबविली पाहिजे. जेणेकरून अशा वीज चोरीला आळा घालता येईल. वीज चोरट्यांवर दंडासह कठोर शिक्षेचीही कारवाई केली पाहिजे. जेणेकरून पुन्हा अशी चोरी करण्यास कुणा धजावणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in