Election : शिक्षकांची रखडलेली पेन्शन योजना, शिक्षक भरती हाच निवडणुकीत कळीचा मुद्दा

Teachers Constituency Election : मतदार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमधून कुणाला पसंती देतात हे येत्या 2 फेब्रुवारीला स्पष्ट होईल
Sudhakar Adbale, Nagorao Ganar, Rajendra Zade
Sudhakar Adbale, Nagorao Ganar, Rajendra ZadeSarkarnama

Teachers Constituency Election : नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा प्रचार आज (ता.28) थंडावला आहे. भाजपने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार यांना तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरविले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षकांची जुनी पेन्शन योजना व शिक्षकांची रखडलेली भरती हे दोन प्रश्न चर्चेत आहे.

नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक ३० जानेवारी रोजी होत आहे. अनेक दिवस राजकीय विचारमंथन केल्यानंतर महाविकास आघाडीने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे निवडणूक रिंगणात नशीब आजमावित आहेत. शिवसेना उमेदवार गंगाधर नाकाडे यांना माघार घ्यायला लावल्याने शिवसैनिकांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे.

Sudhakar Adbale, Nagorao Ganar, Rajendra Zade
Nashik : पदवीधरच्या प्रचार तोफा थंडावल्या : शेवटच्या सभेत तांबे-पाटील मतदारांना काय म्हणाले?

नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे. मतदार संघात ३९,४०० मतदार आहेत. ४० टक्के नागपूर जिल्हा, १८ टक्के चंद्रपूर, ४२ टक्के वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मतदार आहेत. निर्णय मतदार संख्या खऱ्या अर्थाने नागपूर जिल्ह्यात आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार हे मागील बारा वर्षापासून या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर लाखोच्या संख्येत असलेल्या शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रश्नासाठी विधानभवनावर भव्य असा मोर्चा काढला.

राज्यात शिक्षकांची भरती बंद असल्याने अनेक शाळांमध्ये इंग्रजी व गणित विषयाचे शिक्षक उपलब्ध नाही. १९९२ ते २०१० दरम्यान विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आमदार म्हणून विश्वनाथ डायगव्हाणे हे होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडून सरकारला धारेवर धरण्याचे काम केले होते.

Sudhakar Adbale, Nagorao Ganar, Rajendra Zade
Devendra Fadnavis : "पुढील तीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदललेला असेल" : फडणवीसांचा दावा!

नागपूर पदवीधर शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर होताच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांना पुन्हा जुनी पेंशन योजना सुरू करण्याचे आश्वासन औरंगाबाद येथे पार पडलेल्या प्रचार सभेत दिले आहे. जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची धमक या सरकारमध्ये आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती दीड महिन्यात करण्यात येणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. निवडणूक डोळ्यापुढे ठेवून भाजपने ही घोषणा केल्याची चर्चा शिक्षक मतदारांमध्ये सुरू आहे.

Sudhakar Adbale, Nagorao Ganar, Rajendra Zade
Exam : पुणे विद्यापीठाच्या 30 जानेवारीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; 'ही' आहे पुढची तारीख

सर्वच उमेदवारांचे समर्थक आपला उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. तीनही उमेदवारांनी एकमेकांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. यामधून शिक्षक मतदार कुणाला पसंती देतात हे दोन फेब्रुवारीला स्पष्ट होईल.

शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी एकसंघ होऊन प्रचाराच्या कामाला लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन्ही बाजू कंपनी काम करीत आहेत. त्यामुळे मतदार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमधून दोघांपैकी कुणाला पसंती देतात हे येत्या 2 फेब्रुवारीला स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com