निवडणूक आली अन् पुन्हा चर्चा सुरू झाली कॉंग्रेस-वंचितच्या युतीची...

अकोला (Akola) जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली आहे. राजकीय समीकरणे आंबेडकर यांच्या पक्षाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही
Prakash Ambedkar Akola
Prakash Ambedkar AkolaSarkarnama

अकोला : कोणतीही निवडणूक आली की सर्वप्रथम चर्चा सुरू होते ती काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची. आताही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसोबतच राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेस व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीच्या अफवांना ऊत आला आहे.

अकोला (Akola) जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय समीकरणे आंबेडकर यांच्या पक्षाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातून काँग्रेसचे वर्चस्व हळूहळू कमी होत गेले. आंबेडकर यांचा अकोल्यात उदय झाल्यापासून गेले २५ वर्षे काँग्रेस जिल्ह्यात अस्तित्वाचा लढा लढत आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी निवडणुका आल्याकी काँग्रेस व प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या युतीची चर्चा सुरू होते. सध्या काँग्रेसने राज्यसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू केली असल्याचे वृत्त सर्वत्र पसरविले जात आहे. या वृत्ताबाबत खुद्द वंचित बहुजन आघाडीतर्फे खंडन करण्यात आले आहे. काँग्रेसचा (Congress) एक गट अशा प्रकारच्या अफवा उठवीत असल्याचेही वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

काँग्रेसच्या वाट्याला एकच जागा, ती कुणाला कशी देणार?

महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवयाच्या सदस्यांच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. त्यापैकी महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली आहे. दोन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. उर्वरित एका जागेसाठी मराठा नेते संभाजी राजे यांनी सर्व पक्षीयांना आवाहन केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने शिवसेनेला या जागेसाठी उमेदवारी दिली तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या समीकरणात काँग्रेसची इच्छा असूनही ते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी देण्याबाबत विचारही करू शकत नाही. त्यामुळे या केवळ अफवा असल्याचे सिद्ध होते.

Prakash Ambedkar Akola
वंचित आक्रमक; आंबेडकरांवरील टीका शिवसेनेच्या बांगरांना भोवणार?

भेटीचे वृत्तही निराधार..

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पाच दिवसांपूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याचे वृत्त निराधार आहे. काँग्रेसकडून कुणीही आंबेडकर यांना भेटले नाही किंवा आंबेडकर यांच्या पक्षाकडूनही काँग्रेसला यासंदर्भात कोणताही प्रस्ताव देण्यात आला नसल्याचा खुलासा वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची बातमी माध्यमांमधून प्रसारित करण्यात आली आहे. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरून खोट्या बातम्या पेरण्याचे काम करीत असतो. अशा खोट्या बातम्या पेरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- सिद्धार्थ मोकळे, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com