एकनाथ शिंदेचे बंड अन् सत्तेचा पेच; अनेकांचे सेटींग बिघडले..

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने राजकारण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

नागपूर : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण केले. महाविकास आघाडीतील नेत्यांना विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सळो की पळो करून सोडले. आता सत्ता कुणाकडे राहिल, हा मोठा पेच निर्माण झाला आहे. या पेचात अनेकांचे सेटींग बिघडले आहे. प्रशासनाची अवस्था अडकित्त्यातील सुपारीसारखी झाल्याचे बघायला मिळत आहे.

काही मंत्र्यांनी तर मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. प्रशासनही सध्या बघ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे बदल्या व पदोन्नत्या रखडणार असल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने राजकारण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिंदे गटाचे लक्ष्य महाविकास आघाडीची सत्ता घालवणे आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) राष्ट्रवादी व कॉंग्रसने आता सत्ता वाचविण्यासाठी शड्डू ठोकला आहे. कामावरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते. ३१ मेपर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे अपेक्षित होते. परंतु त्याला ३० जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली. त्यामुळे १ जुलैपासून बदलीची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन होणार असून आवश्यक माहिती शासनाकडे पाठविण्यात येत आहे.

परंतु सध्या राज्य सरकारच्या अस्थिरतेमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी तातडीची व नागरिकांशी संबंधित कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. बदली व पदोन्नतीसाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांची सहमती आवश्यक आहे. शिवसेनेच्या कोट्यातील अनेक मंत्री राज्याबाहेर आहे. तर बदल्यांच्या कारणावरून माजी गृहमंत्री अडचणीत आले. त्यामुळे अशा वातावरणात बदल्यांकडे कुणीच लक्ष देत नसल्याची माहिती पुढे आली आहे. पदोन्नतीच्या फायलींचीही तशीच स्थिती आहे. त्यामुळे सर्वच विभागाच्या बदल्या व पदोन्नती रखडणार असल्याचे दिसते.

Eknath Shinde
बंडखोर एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचे आमदार जोरगेवारांनी सांगितले ‘हे’ कारण...

पावसाळी अधिवेशनानंतर बदल्या?

सध्याची स्थिती लक्षात विशेष अधिवेशन होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास यात आठ पंधरा दिवसांचा वेळ जाईल. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनाची लगबग सुरू होईल. प्रशासन याच कामात व्यस्त होतील. बदल्यांमुळे कामे प्रभावित होतात. त्यामुळे पावसाळी अधिवेशननंतरच बदल्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर काहींच्या मते बदल्या वेळेत होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com