Eknath Shinde News: सीमावादावर ठराव मांडणारे एकनाथ शिंदे हे तिसरे मुख्यमंत्री, कोणते मुद्दे मांडणार?

Border Dispute: हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः याबाबतचा ठराव मांडणार आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Maharashtra and karnataka Border Issue : महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील सीमावाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येत्या सोमवारपासून नागपुरात (Nagpur) सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वतः याबाबतचा ठराव मांडणार आहेत. यापूर्वी दोन मुख्यमंत्र्यांनी ठराव मांडला होता. तर अनेक मुख्यमंत्र्यांच्या काळात चर्चा झाली. तरीही हा विषय गेल्या साठ वर्षांपासून कायम आहे.

कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रामधील (Maharashtra) सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील काही गावांवर दावा केल्यामुळे दोन्ही राज्यातील सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. कर्नाटकातील बेळगाव, (Belgaum) निपाणी व इतर मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात सामील होण्यास तयार आहे. मराठी भाषिक भाग असल्याने संबंधित क्षेत्र महाराष्ट्रात सामील करण्याचा मुद्दा अनेकदा चर्चेला आला आहे. नुकतेच बोम्मई (Basavraj Bommai) यांच्या वक्तव्यावरून दोन्ही राज्यात हिंसक घटना घडल्या. त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला. सीमावादाचा विषय केंद्राकडे गेला आहे. तसा हा विषय फार जुना आहे. अनेकदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्याचे पडसाद उमटले आहे.

सर्वप्रथम महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच हा विषय चर्चेला आला होता. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ११ मार्च १९६० मध्ये याबाबतचा शासकीय ठराव मांडला होता. त्यानंतर ५ एप्रिल १९६६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शासकीय ठराव मांडला होता. त्यानंतर २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात या संदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातही चर्चा या मुद्द्यावर अनेकदा चर्चा झाली. अनेकदा या विषयावर चर्चा, लक्षवेधी तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले.

Eknath Shinde
Eknath Shinde News; शिंदे गटाच्या झंजावाताने शिवसेना अलर्ट!

बेळगाव महानगर पालिका २०११ ला बरखास्त करण्यात आली होती. त्याच्या निषेधाचा ठराव तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला होता. सीमावादावर तोडगा काढण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व केंद्रात कॉंग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे केंद्राकडून यावर तोडगा काढण्याची सूचना विधान परिषदेत नितीन गडकरी यांनी त्यावेळी केली होती. आता नव्याने हा वाद निर्माण झाला आहे. १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे स्वतः सीमावादासंदर्भात ठराव मांडणार आहे. त्यामुळे कोणता ठराव मांडतात, त्यात कोणते मुद्दे घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com