Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘यासाठी’ आज नागपुरात येणार?

Nagpur : काल देवेंद्र फडणवीस, तर आज अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Amit Shaha's tour of Nagpur : मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय. मनातले मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री, अशी बॅनरबाजी सुरू झाली आहे. कालपासून (ता. २५) हो लोण नागपुरातही पोहोचले. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर आज अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून नागपुरात बॅनर लागले. (The sloganeering of the Chief Minister in mind, the future Chief Minister has started)

अजित पवार भाजपसोबत जाणार आणि मुख्यमंत्री होणार, १६ आमदारांचा निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे दावे भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चलबिचल होणे साहजिक आहे. त्यातच ते अचानक गावी गेल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्‍न सर्वत्र चर्चिला जातोय. भारतीय जनता पक्षात सर्व निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शाह घेतात. त्यामुळे येथे महाराष्ट्रात फार कुणाशी काही चर्चा करून त्याचे फलित मिळणार नाही, कदाचित असे वाटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेण्याचे निश्‍चित केले आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून शिंदे आज रात्री नागपुरात दाखल होणार असल्याचेही सूत्र सांगतात.

गृहमंत्री अमित शाह यांचे आज रात्री १० वाजता नागपुरात दाखल होणार आहेत. येथील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये त्यांचा मुक्काम राहणार आहे. त्यामुळे आज रात्री तेथे नेते आणि कार्यकर्त्यांची वर्दळ राहणार आहे. येथे एकनाथ शिंदे अमित शाह यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकारणाच्या परिस्थितीवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांनी अचानक गाठलं गाव,नाराजीच्या चर्चांना उधाण; सामंत,केसरकरांनी'सस्पेन्स'वाढवला

एकनाथ शिंदे यांच्या आज नागपूरला येण्यामागचे आणखी एक कारण असे सांगितले जाते की, त्यांना आता अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक वाढवायची आहे. कारण भाजपमध्ये सबकुछ मोदी-शाह हेच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांसोबत जरी ते काम करीत आहेत, तरी थेट शिर्षस्थ नेत्यांच्या संपर्कात राहणे केव्हाही चांगले. त्यामुळे थेट अमित शाहांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज नागपुरात दाखल होणार आहेत, असे सूत्र सांगतात.

खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपुर्वी, “आमची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आहेच. एकत्र काम करण्याची इच्छाही आहे. पण इच्छा असणं पुरेसं नसतं.” असं विधान केलं होत. या चर्चांमुळे राजकारण ढवळून निघालं होतं. त्यामुळे भाजप-शिंदे (Eknath Shinde) आणि महाविकास आघाडीत नेमकं चाललंय तरी काय, हे कळायला मार्ग नाही.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com