Buldhana Politics | Sanjay Gaikwad
Buldhana Politics | Sanjay Gaikwad Sarkarnama

Buldhana Politics : बुलडाण्यात कॉंग्रेसला भगदाड ! संजय गायकवाडांनी डाव टाकला...

बुलढाण्यात शिंदे गटाने पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या गडाला सुरुंग लावला आहे

Buldhana Politics : विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. असे असतानाच बुलढाण्यात शिंदे गटाने पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या गडाला सुरुंग लावला आहे. मोताळा नगरपंचायतीमधील काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आल्याची माहिती आहे.

पण कॉंग्रेसच्या नगरसेवकांचा शिंदे गटातील हा प्रवेश विधानपरिषद निवडणूकीचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आमदार गायकवाड यांनी काँग्रेसला खिंडार पाडत नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचलं आहे. गायकवाड यांच्यां या कामगिरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून अभिनंदन केलं आहे. इतकेच नव्हे तर नगरसेवकांच्या वॉर्डातील विकासकामांसाठी नगरविकास खात्यातून निधी देण्याचंही आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

Buldhana Politics | Sanjay Gaikwad
Shubhangi Patil: ''नाशिक पदवीधर निवडणुकीत विजय आपलाच,फक्त..''; शुभांगी पाटलांचा मोठा दावा

दरम्यान, आज सकाळी आठ वाजल्यापासून अमरावती पदवीधरच्या जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अमरावती पदवीधरमध्ये डॉ. रणजित पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्यात मुख्य लढत आहे. यासाठी अमरावती विभागात 262 मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. २ फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात मतदान होणार आहे. भाजपचे डॉ. रणजीत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. अनिल अमलकर आणि आणखी २३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे डॉ. रणजीत पाटील यांच्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी संपूर्ण विभाग पिंजून काढला होते. तर धीरज लिंगाडे यांच्यासाठीही महाविकास आघाडीनेही चांगलाच जोर लावलाआहे. त्यांनी स्वत: १२ दिवसांत पाचशेहून अधिक गावांना भेटी दिल्याचा दावा केला आहे. तसेच, निवडणूक प्रचारात जुनी पेन्शन योजना हा विषय महत्त्वाचा मुद्दा होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com