Devendra Fadnavis यांच्या जिल्ह्यात मंत्र्यांचे पुतळे जळत होते, पण पोलिसांना साधी भनकही नव्हती !

Gobarwahi Police : गोबरवाही पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे.
Bhandara
BhandaraSarkarnama

Maharashtra Winter Session News : नागपुरात (Nagpur) हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अख्ख मंत्रीमंडळ नागपुरात असतानासुध्दा भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस स्टेशनपासून अवघ्या १० किलोमिटर अंतरावर असलेल्या गणेशपुर गावात महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्याचे पुतळे जळत होते. पण याची साधी भनकही गोबरवाही पोलीसांना नव्हती. त्यामुळे प्रोटोकॉलची पार ऐसीतेसी करणाऱ्या गोबरवाही पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanis) हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे या जिल्हाची कायद्या व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी भंडारा (Bhandara) पोलिनांवर आहे. असे असताना चक्क गोबरवाही पोलिसांद्वारे चक्क मंत्राबाबत असलेल्या प्रोटोकोलचे हनन झाले आहे. गणेशपूर गावामध्ये आदिवासी नेत्याच्या नेतृत्वात २६ डिसेंबरला चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्या विरोधात निषेध आंदोलन करून प्रतीकात्मक पुतळे जाळले गेले होते.

देशात आदिवासी समाज हा मूलनिवासी आहे. तरीसुध्दा आदिवासी समाज आज उपेक्षित आहे. राज्य घटनेने आदिवासी लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठीं आदिवासी लोकांना विषेश मुभा दिली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत आदिवासींचे बरेच आमदार असूनही आदिवासी लोकांचे प्रश्न मार्गी लागले नसल्याने वारंवार सरकारचे लक्ष आदिवासी लोकांकडे वळविण्याचे काम आदिवासी समाजाने केले आहे. तरीसुद्धा १२ हजार ५०० अधिसंख्या पदावर बोगस अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून सुप्रीम कोर्टाने बोगस आदिवासी ठरवत यांना काढण्याचे आदेश दिले.

तरी या एकनाथ शिंदे, फडणवीस सरकारने बोगस आदिवासींना नियमित करण्याचे पाप केल्याने खऱ्या आदिवासी समाजावर अन्याय असल्याचे समजून आदिवासी समाजाच्या लोकांनी तुमसर तालुक्यातील गणेशपुर गावात आदिवासी मंत्री व महाराष्ट्र सरकारचे प्रतीकात्मक पुतळे तयार करून गावातून अंत्ययात्रा काढली आणि गावाच्या वेशीवर मुखाग्नि देण्यात आला होता.

आता खरा प्रश्न असा आहे की गोबरवाही पोलिस स्टेशनअंतर्गत केवळ १० किलोमिटर अंतरावर महाराष्ट्र सरकारचे पुतले जळत होते. देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असूनसुध्दा त्यांच्या जिल्ह्यात त्यांचेच पुतळे जळत असताना पोलीसांना यांची माहिती का झाली नाही, पोलिसांना आंदोलन झाल्याची माहिती नव्हती. एकीकडे मंत्र्यांना असलेल्या प्रोटोकॉलचे हनन होत असतांना गोबरवाही पोलिसांचा खुफिया विभाग काय करत होता, असा सवाल उपस्थित होत आहे.

Bhandara
Rashmi Shukla Phone Tapping: शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का ; फोन टॅपिंग प्रकरणात न्यायालयाने दिला 'हा' आदेश

या सर्व घडामोडीत गोबरवाही पोलिस स्टेशनचे ठाणेदार आपल्या स्थानीक गुन्हे शाखेत झालेल्या बदलीच्या आनंदात मग्न असल्याचे दिसून आले. या आंदोलनादरम्यान त्यांच्या अधिकार क्षेत्रात हे आंदोलन त्यांना माहित नसणे, ही बाब चिंता करण्याची आहे. स्थानीक गुन्हे शाखेत ठाणेदारांची बदली झाल्याची माहिती आहे. एकीकडे १० किलोमिटर अंतरावर घडामोडी होत असतानासुध्दा संबधित अधिकाऱ्याला त्याची भनक न लागणे आणि दुसरीकडे स्थानिक गून्हे शाखेसारख्या गुन्ह्यांचा अन्वेषण करणाऱ्या विभागामध्ये बदली होणे. हेही एक कोडेच आहे.

या पुतळे जलाव आंदोलनात पोलिसांच्या झालेल्या अक्षम्य चुकीकडे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पोलिस अधिक्षक लोहित मतानी कसे बघतात, हे पाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान आता मंत्र्यांचे पुतळे जाळण्याचा मुद्दा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कसा हाताळला जातो, हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com