भावना गवळींना ईडीचा दणका! निकटवर्तीयाच्या पावणेचार कोटींच्या संपत्तीवर टाच

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आता चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.
भावना गवळींना ईडीचा दणका! निकटवर्तीयाच्या पावणेचार कोटींच्या संपत्तीवर टाच
Bhavana Gawlisarkarnama

नागपूर : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या (Shivsena) खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) आता चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. सक्त वसुली संचालनालयाने (ED) त्यांना तिसऱ्यांदा समन्स बजावूनही त्या चौकशीला हजर राहिल्या नव्हत्या. आता ईडीने त्यांच्या भोवतीचा फास आवळण्यास सुरवात केली असून, त्यांच्या निकटवर्तीयाच्या पावणेचार कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी निगडित ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली होती. आता सईद खान हा भावना गवळी यांचा निकटवर्तीय आहेय. त्याची पावणेचार कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्याने महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणचे पैसे बेकायदा पद्धतीने दुसरीकडे वळवले होते.

Bhavana Gawli
अन्यथा परमबीरसिंहांवर कारवाई करावी लागेल! चांदीवाल समितीची तंबी

ईडीने गवळी यांना 4 ऑक्टोबरला पहिले समन्स बजावले होते. त्यावेळी त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नव्हत्या. त्यानंतर 15 दिवसांनी त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले होते. चिकुनगुन्या झाल्याचे कारण देत त्यावेळी गवळी चौकशीला हजर राहिल्या नव्हत्या. त्यानंतर ईडीने त्यांना तिसरे समन्स बजावून 23 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, संसद अधिवेशनाच्या तयारीचे कारण देत त्यांनी हजर राहणे टाळले होते.

Bhavana Gawli
बापरे! पूर्ण लसीकरण झालेल्या वैद्यकीयच्या 66 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

खासदार गवळी यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. ईडीने गेल्या महिन्यात खासदार गवळींचे निकटवर्तीय आणि बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखान्याचे संचालक सईद खान यांना अटक केली होती. गवळी यांनी बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीत कोट्यवधींचा आर्थिक घोळ केल्याची तक्रार शिवसेनेचे माजी नगरसेवक हरीश सारडा यांनी केली आहे. या प्रकरणी खासदार गवळींवर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in