‘या’ कारणामुळे जयस्वालांचे मंत्रिपद हुकणार, अन् भोंडेकरांचा मार्ग प्रशस्त होणार?

शिंदे (Eknath Shinde) सरकार आता स्वच्छ प्रतिमेच्या आमदारांना मंत्रिपदाची जबाबदारी देणार निश्चित झालेले आहे.
MLA Ashish Jaiswal and MLA Narendra Bhondekar
MLA Ashish Jaiswal and MLA Narendra BhondekarSarkarnama

भंडारा : खनिकर्म महामंडळातील घोटाळ्याच्या आरोपामुळे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार ॲड. आशिष जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांचे मंत्रिपद हुकणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचा फायदा भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांना होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मंत्रिमंडळ स्थापनेत नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे सूत्र सांगतात. त्यामुळे या वेळी भंडारावासीयांची (Bhandara) मंत्रिपदाची आशा पूर्ण होईल, असा विश्वास वाटू लागला आहे. काल शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन केली असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या सर्व गोष्टी एका राजकीय भूकंपानंतर घडल्याने शिंदे सरकारवर अनेक आरोप लावले जात आहेत. त्यामुळे शिंदे सरकार आता स्वच्छ प्रतिमेच्या आमदारांना मंत्रिपदाची जबाबदारी देणार निश्चित झालेले आहे.

पूर्व विदर्भाचा विचार केला असता भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. परिणय फुके आणि बंटी भांगडिया यांची नावे समोर येत आहेत. शिवसेना समर्थीत दोन आमदार ॲड. आशिष जयस्वाल आणि नरेंद्र भोंडेकर यांचीही नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. भाजप वगळता या दोन आमदारांचा विचार केला असता रामटेक विधानसभा क्षेत्राचे शिवसेना समर्थीत अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 300 कोटी रुपयांचा खनिकर्म घोटाळा केल्याचा आरोप केला असून त्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे शिंदे सरकारने जयस्वाल यांना मंत्रिपद दिले तर विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिल्यासारखे होईल.

MLA Ashish Jaiswal and MLA Narendra Bhondekar
जुन्या मैत्रीमुळे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर एकनाथ शिदेंसोबत गेले !

अशा परिस्थितीत आशिष जयस्वाल यांना मंत्रिपद देण्याची चूक एकनाथ शिंदे करणार नाहीत, असे वाटते. तर दुसरीकडे याचा फायदा भंडारा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांना होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे आमदार नरेंद्र भोंडेकर हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार ठरतात. त्याचबरोबर आशिष जयस्वाल यांना रामटेकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कडवा विरोध आहे. हा विरोधही त्यांना भोवणार असल्याचे सांगितले जाते. उलटपक्षी जर भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा विचार केला, तर सध्या तरी यांच्यावर कोणताही घोटाळा असल्याचा आरोप झालेला नाही.

दुसरीकडे नरेंद्र भोंडेकर हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती मानले जातात. शिंदे यांच्या विश्वासातल्या फळीवर आमदार भोंडेकर यांचे नाव आहे. शिंदे यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले होते. त्यामुळे नरेंद्र भोंडेकर यांच्यासारखा विश्वासातला आमदार मंत्री झाला तर गडचिरोलीकडे भोंडेकर यांच्या रूपाने लक्ष देता येईल. या सर्व बाबींचा विचार केला असता मंत्रिपदाच्या शर्यतीत शिंदे सरकारमध्ये स्वच्छ प्रतिमेचे नरेंद्र भोंडेकर हे आशिष जयस्वाल यांच्यापेक्षा वरचढ ठरत असल्याचे दिसते. त्यामुळेच की काय घोटाळ्याचा आरोप असलेल्या आशिष जयस्वाल यांचे मंत्रिपद हुकण्याची शक्यता वर्तविला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com