Bhandara : भंडाऱ्यातही रुजणार बीआरएसची पाळेमुळे, लवकरच जिल्हा शाखेची स्थापना !

Bhandara : भंडारा जिल्ह्यातील एक मोठा नेता लवकरच बीआरएस मध्ये प्रवेश करणार.
BRS KCR Bhandara
BRS KCR BhandaraSarkarnama

KCR's BRS News of Bhandara : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर अर्थात के. चंद्रशेखर राव यांची नुकतीच नांदेडमध्ये सभा झाली. असून केसीआर यांच्या बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्षाने महाराष्ट्रात पाय रोवायला सुरुवात केली आहे. असे असताना भविष्यात भंडाऱ्यातही केसीआरच्या बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्षाची पाळेमुळे रुजणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भंडारा जिल्ह्यातील एक मोठा नेता लवकरच बीआरएस मध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. दरम्यान येत्या काही महिन्यांत बीआरएस पक्षाची शाखा भंडारा जिल्ह्यात बीआरएसची शाखा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. येत्या काही महिन्यांत तसे बॅनर आणि पोस्टर्सही जिल्ह्यात बघायला मिळणार आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी ‘अब की बार किसान सरकार’ असा नारा देत पक्षाला राष्ट्रीय स्वरूप देण्याच्या दिशेने एलगार पुकारला आहे. विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्रात आपली शक्ती वाढविली असताना भंडारा जिल्ह्यातही या पक्षाची शाखा असणार आहे. भंडारा जिल्ह्यातील एक माजी आमदार बीआरएसच्या वाटेवर आहे. याबाबत दोन महिन्यांपूर्वी त्या माजी आमदाराने तेलंगणाला जाऊन केसीआर यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे.

भंडारा जिल्ह्यात बीआरएस उभारणी करण्यासाठी लागणारी सर्व आर्थिक व भौतिक यंत्रणाही या माजी आमदारांना देण्याचे ठरले आहे. तर दुसरी कडे भंडाऱ्यातील ‘त्या’ नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करायला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्याचे मन वळवत, येत्या काही महिन्यांत बीआरएस पक्षात कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे लवकरच भंडारा जिल्ह्यात बीआरएस पक्षाचे पोस्टर झळकणार आहे.

BRS KCR Bhandara
Bhandara : आता पेटतोय महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावाद, भंडारा जिल्ह्यातील लोक होताहेत आक्रमक...

दुसरीकडे नव्या पक्षाचे नाव मिळणार असल्याने त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला आहे. बीआरएस (BRS) पक्षाला भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोचविण्यास सज्ज झाले आहे. त्यामुळे लवकरच भंडारा जिल्ह्यात आता भाजप (BJP) कॉंग्रेस, (Congress) राष्ट्रवादी कॉंग्रेस, (NCP) शिवसेना (Shivsena) या राजकीय पक्षांसह बीआरएसची चर्चा होणार आहे. त्यामुळे लवकरच येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीआरएसचीसुद्धा एंट्री होणार आहे.

राजकीय वातावरण तापवणारी उलाढाल जिल्ह्यात लवकरच होऊ घातली आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील त्या नेत्याला बीआरएस पक्षाद्वारे राज्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याने त्या नेत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यामुळे लवकरच भंडाऱ्यात बीआरएस पक्षाची जाहीर सभा होणार असल्याचीही माहिती आहे. जिल्हावासीयांनाही बीआरएसच्या प्रवेशाची उत्सुकता लागलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com