सतीश उकेंमुळे भाजपचे काही नेते कायद्याच्या कचाट्यात अडकले, म्हणून...

माझा आणि सतीश उके यांचा संबंध लावला जात असेल, तर मग त्याच न्यायाने राम जेठमलानी व अरुण जेटली यांचाही संबंध लावायचा का? असा प्रश्न पटोले (Nana Patole) यांनी उपस्थित केला.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

मुंबई : नागपूरचे (Nagpur) वकील सतीश उके यांनी भाजप नेत्यांच्या विरोधातील खटले लढवले. त्यातील काही प्रकरणांची सुनावणीची वेळ जवळ आली आहे. यामध्ये त्यांचे काही नेते कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. म्हणून रातोरात मुंबईहून (Mumbai) ईडीचे पथक पाठवून सतीश उके यांना अटक करण्यात आली, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

नागपूरचे वकील सतीश उके (Satish Uke) यांना ईडीने अटक केल्यानंतर ‘नाना पटोले (Nana Patole) यांच्या वकिलाला अटक’ असा अपप्रचार केला जात आहे. राज्यात काँग्रेस पक्षाला समर्थन वाढत असल्याने जाणीवपूर्वक माझी व काँग्रेस पक्षाची बदनामी केली जात आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून दबावतंत्र वापरले जात आहे.

राजकीय विरोधकांना टार्गेट करत असतानाच आता त्यांच्याशी संबंधित लोकांवरही कारवाई केली जात आहे. नागपूरचे विधिज्ञ सतीश उके यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या तक्रारी केल्या असून त्यातील काही प्रकरणांत भाजपचे नेते कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात. म्हणूनच ईडीच्या मार्फत त्यांच्यावर षड्यंत्र रचून कारवाई केली. त्यासाठी मुंबईचे ईडी पथक नागपुरात आणून तसेच केंद्रीय पोलीस दल आणून ही कारवाई केली. या कारवाईच्या वेळी नागपूर ईडी व पोलिसांनाही अंधारात ठेवण्यात आले.

सतीश उके यांनी अनेक महत्वाच्या प्रकरणांत न्यायालयात बाजू मांडली आहे. ईडीने त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर मात्र सतीश उके हे फक्त नाना पटोले यांचेच वकील आहेत, असे चित्र निर्माण करून माझी बदनामी केली जात आहे, पण त्यात ते यशस्वी होणार नाहीत. शेअर मार्केट घोटाळा करणारा हर्षद मेहताचे वकीलपत्र भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी घेतले होते. वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले राम जेठमलानी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांचे वकीलपत्र घेतले होते. तसेच संसद हल्ल्यातील दोषी दहशतवादी अफजल गुरुचेही वकीलपत्र जेठमलानी यांनी घेतले होते. माझा आणि सतीश उके यांचा संबंध लावला जात असेल, तर मग त्याच न्यायाने राम जेठमलानी व अरुण जेटली यांचाही संबंध लावायचा का? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.

Nana Patole
कुणीही हे विसरू नये की, कॉंग्रेस बाप आहे; नाना पटोले गरजले...

राज्यात काँग्रेस पक्षाला सर्वच स्तरातून पाठिंबा वाढत आहे. एससी, एसटी, ओबीसी समाजासह सर्वच घटकांचे काँग्रेसला समर्थन वाढत आहे. काँग्रेसला मिळणारे हे वाढते समर्थन भारतीय जनता पक्षाला अडचणीचे ठरत असल्याने सतीश उकेंच्या कारवाईच्या आडून मला व काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. पण आम्ही अशा बदनामीला घाबरत नाही, असेही पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com