नाना पटोलेंमुळे विदर्भातील कॉंग्रेसचे डझनभर नेते झाले प्रभारी...

प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने नागपूर विभागीय पदवीधर संघाचे आमदार अभिजित वंजारी, नाना गावंडे, Abhijeet Wanjari and Nana Gawande यांचा समावेश आहे.
Abhijeet Wanjari, Umakant Agnihotri and Kishor Gajbhiye.
Abhijeet Wanjari, Umakant Agnihotri and Kishor Gajbhiye.Sarkarnama

नागपूर : पुढील महिन्यात विधानपरिषद आणि त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना वगळता इतर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. कॉंग्रेसने जिल्ह्यांच्या प्रभारींची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भातील असल्यामुळे विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांना चांगले दिवस आले आहेत.

विदर्भातील सुमारे डझनभर नेत्यांची वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने नागपूर विभागीय पदवीधर संघाचे आमदार अभिजित वंजारी, नाना गावंडे, रामकिशन ओझा, उमाकांत अग्निहोत्री, किशोर गजभिये, वामनराव कासावार, अमर काळे, अविनाश वारजूकर, शकूर नागानी, वीरेंद्र जगताप यांचा समावेश आहे.

अभिजित वंजारी यांच्याकडे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाना गावंडे बुलडाणा, रामकिशन ओझा जालना, अविनाश वारजूकर अकोला, किशोर गजभिये चंद्रपूर, नामदेवराव किरपान गडचिरोली, शकूर नगानी अमरावती, अमर काळे अमरावती ग्रामीण तसेच उमाकांत अग्निहोत्री यांच्याकडे उल्हासनगर शहराचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या सोबतीला सहप्रभारीही नियुक्त करण्यात आले आहेत.

नागपूर शहरात जगताप, ग्रामीणमध्ये कासावार

नागपूर शहराचे प्रभारी म्हणून माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची तर ग्रामीणचे प्रभारी म्हणून वामनराव कासावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जगताप यांनी समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध केला होता. त्यांच्या मतदारसंघातील जागा देण्यासही त्यांनी नकार दिला होता. वामनराव कासावार यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील आहेत. ते वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

Abhijeet Wanjari, Umakant Agnihotri and Kishor Gajbhiye.
स्वबळावर लढल्याशिवाय काॅंग्रेस कार्यकर्ता टिकणार नाही : नानांचा हट्ट कायम

प्रभारींच्या नियुक्या झाल्यामुळे कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य बघायला मिळत आहे. नागपुरातील निवडणुकांच्या तयारीमध्ये सध्यातरी कॉंग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष आघाडीवर दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने नागपुरात संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली होती. आता आम्ही ‘मोठा भाऊ’ आहोत, असे म्हणत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या साथीने जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देणे सुरू केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आणि पटेलांचा ‘मोठा भाऊ’ औट घटकेचा ठरला. सध्यातरी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुठलीही तयारी सुरू असल्याचे दिसत नाही. शिवसेनेचीही स्थिती काहीशी तशीच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com