बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची एकनाथ शिंदेंनी स्वत: गाडी चालवत केली पाहणी

Samruddhi mahamarg|Eknath Khadse: समृद्धीची पाहणी करण्यासाठी खास मुंबईहून आलेल्या 'ऑटो कार इंडिया' या वाहन उद्योगातील अग्रगण्य मासिकाच्या टीमने समृद्धी महामार्गावर येऊन विशेष भाग चित्रित केला आहे.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

नागपूर : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्गाचा (Samruddhi mahamarg) नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्पा लवकरच खुला होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. आज (ता.27 मार्च) नागपूरमध्ये येऊन समृद्धी महामार्गाच्या याच पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी शिंदे यांनी केली. तसेच या महामार्गावर इलेक्ट्रिक कारचे सारथ्य करून त्यांनी फेरफटकाही मारला.

Eknath Khadse
संभाजी ब्रिगेडचा गनिमी कावा राज्यपालांना समजला अन् ऐनवेळी दौराच केला रद्द

समृद्धी महामार्गाचे शिर्डी ते नागपूर हे पहिल्या टप्प्यातील काम आता जवळपास पूर्ण झाले असून फक्त रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करायच्या सोयी सुविधा तसेच एक्झिट पॉईंट्सवर उभारण्यात येणारे टोलनाके उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. या महामार्गाचे काम अतिशय उत्तम झाले असून पहिल्या टप्प्यातील रस्ता बांधून तयार झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉईंटपाशी खास रोटरी सर्कल तयार करण्यात येणार असून त्यांचे काम देखील सुरू आहे. आज मंत्री शिंदे यांनी या रोटरी सर्कलच्या कामाचा आढावा घेतला, याच सर्कलच्या मध्यभागी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे नियोजित आहे. सध्या या सर्कलचे काम प्रगतीपथावर असून ते देखील येत्या काही महिन्यात पूर्ण होईल.

Eknath Khadse
'शिवसेनेच्या माजी आमदाराने आदित्य ठाकरेंचा आदेश झुगारला'

या महामार्गाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर 8 ओव्हरपास आणि 76 अंडरपास तयार करण्यात आले आहेत. या ओव्हरपासच्या कामाची देखील मंत्री शिंदे यांनी आज पाहणी केली. तसेच वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी नॉईस बॅरीयर्स देखील बसवण्यात येणार आहेत. आनंदाची बाब म्हणजे या ओव्हरपास वरून वन्यजीवांनी ये-जा सुरू केली असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांना हे ओव्हरपास जंगलाचा भागच वाटावे यासाठी त्यांची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली असून त्यात खास झाडे देखील लावण्यात आलेली आहेत.

Eknath Khadse
राज्यातील नेत्यांचे दाऊदशी संबध; अरुण गवळींच्या पत्नीचा गौप्यस्फोट

समृद्धीची पाहणी करण्यासाठी खास मुंबईहून आलेल्या 'ऑटो कार इंडिया' या वाहन उद्योगातील अग्रगण्य मासिकाच्या टीमने समृद्धी महामार्गावर येऊन आज विशेष भाग चित्रित केला. त्यासोबतच या महामार्गावर फेरारी, लॅमबोर्गनी, मर्सिडीज यांच्या सुपरकार्सची विशेष रॅलीचं देखील आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचं उद्घाटन मंत्री शिंदे आणि एमएससारडीसीचे महा-व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी या मासिकाच्या टीमने केलेल्या विनंतीवरून मर्सिडीजच्या नव्या पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक गाडीचे सारथ्य करून या रस्त्यावरून शिंदे यांनी फेरफटका मारला. यावेळी एमएससारडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, एमएसआरडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, आणि एमएससारडीसीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com