डॉ. भोयरांचे आक्षेप फेटाळले; बावनकुळेंचा अर्ज स्वीकृत, ९ तास चालली सुनावणी...

त्यांच्या पत्नीच्या Jyoti Bawankule नावे एक हॉल असून वस्तू व सेवा कर रकाना निरंक दाखविण्यात आला असल्याचे आक्षेप त्यांनी Chotu Bhoyar नोंदविले.
डॉ. भोयरांचे आक्षेप फेटाळले; बावनकुळेंचा अर्ज स्वीकृत, ९ तास चालली सुनावणी...
Chandrashekhar Bawankule and Dr. Ravindra Bhoyar Sarkarnama

नागपूर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी पाच उमेदवारांनी अर्ज भरले. कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर यांनी भाजप उमेदवार बावनकुळेंच्या अर्जावर आक्षेप घेतला. या आक्षेपावर तब्बल ९ तास सुनावणी चालली. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी भोयरांचे आक्षेप फेटाळून लावले.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी पाच उमेदवारांनी अर्ज भरले. त्यांची छाननी आज करण्यात आली. दरम्यान, सर्व पाचही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तत्पूर्वी, कॉंग्रेस उमेदवार रवींद्र भोयर यांनी भाजप उमेदवार बावनकुळे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थानचे प्रमुख असून त्यांनी ही माहिती शपथपत्रात दिली नाही. नंतर त्यांनी त्यात सुधारणा करून नवीन शपथपत्र दिले. न्यायालयात असलेल्या खटल्यांची पूर्ण माहिती दिली नाही. मुलगा संकेत याचा अवलंबित म्हणून कुठेही उल्लेख नाही. त्यांच्या पत्नीच्या नावे एक हॉल असून वस्तू व सेवा कर रकाना निरंक दाखविण्यात आला असल्याचे आक्षेप त्यांनी नोंदविले.

बावनकुळे यांच्याकडून राजेश गोल्हर व ॲड. अमित बंड तर भोयर यांच्याकडून सत्यजित दस्तुरे, नितीन दहीकर व सुरज लोलगे यांनी म्हणणे मांडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर उपस्थित होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजता सुनावणी सुरू झाली. रात्री ८.१५ बाजेपर्यंत ही सुनावणी चालली. भोयर यांच्याकडील सर्व आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतले. काही ठिकाणी त्यांची अडचण झाल्याने वरिष्ठ पातळीवरून त्यांनी मार्गदर्शन घेतल्याचे सूत्रांकडून समजते. जवळपास ९ तास सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आक्षेप फेटाळून लावत बावनकुळे यांचा अर्ज स्वीकारला. यावर बोलण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी टाळले.

Chandrashekhar Bawankule and Dr. Ravindra Bhoyar
१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट सवाल…

नियमांची पायमल्ली!

अर्ज दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांचे शपथपत्र हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर लावणे आवश्यक आहे. या निवडणुकीत पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. परंतु, एकाही उमेदवाराचे शपथपत्र कार्यालयाबाहेर दर्शनी भागात लावण्यात आले नाही. त्यामुळे निवडणूक विभागाकडून नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

पाचही अर्ज वैध

चंद्रशेखर बावनकुळे (भाजप), रवींद्र भोयर (कॉंग्रेस), प्रफुल्ल गुडदे (कॉंग्रेस), मंगेश देशमुख (अपक्ष), सुरेश रेवतकर (अपक्ष) या सर्व पाचही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.

जगदंबा देवस्थानबाबतची माहिती भाजप उमेदवार बानवनकुळे यांच्या शपथपत्रात नव्हती. त्यांनी सुधारित शपथपत्र दिले. निवडणूक निर्णय अधिकारी हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दबावात काम करीत आहेत. नियमबाह्य काम होत असल्याने न्यायालयात दाद मागू.

- रवींद्र भोयर, उमेदवार, कॉंग्रेस.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in