Dr. Ambedkar : बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आपण काय केले? यावर गजभिये म्हणाले...

Nagpur : त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकच विकसीत करण्यात यावे.
Kishor Gajbhiye, Nagpur.
Kishor Gajbhiye, Nagpur.Sarkarnama

शहराच्या अंबाझरी परिसरातील डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसरातील स्मारक गरुडा नामक कंपनीने पाडल्याचा आरोप करीत बचाव कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे. एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला हे आंदोलन सुरू आहे.

गेल्या ३५ दिवसांपासून बचाव कृती समितीच्या महिला हे आंदोलन करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राखीव असलेली २० एकर जमीन खासगीकरणाच्या माध्यमातून मेसर्स गरुडा अम्युझमेंट पार्क नागपूर प्रा.लि. या खासगी विकासकाला देऊ नये. त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकच विकसीत करण्यात यावे.

स्मारक उद्ध्वस्त करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशा आंदोलकांच्या मागण्‍या आहेत. यासंदर्भात बचाव कृती समितीचे मुख्य संयोजक किशोर गजभिये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. धनराज डाहाट, बाळू घरडे, सुधीर वासे, राहुल परुळकर, डॉ. सरोज आगलावे आदी होते.

स्मारकाची २० एकर जमीन शासनाची आणि महानगरपालिकेची आहे. ती खासगी ठेकेदाराकडून परत घ्यावी, अशी मागणी करताना किशोर गजभिये यांनी ती जमीन शासनाची असल्याचे पुरावेही सादर केले.

Kishor Gajbhiye, Nagpur.
Nagpur Municipal Corporation: शिंदे-फडणवीसांच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून नागपूर महानगरपालिका होणार मालामाल !

किशोर गजभिये स्वतः सनदी अधिकारी होते. ऐच्छिक सेवानिवृत्ती घेऊन राजकारणात सक्रिय झालेले किशोर गजभिये सनदी अधिकारी होते. मंत्रालयात सचिव म्हणून त्यांनी सेवा दिली आहे. नंतरच्या काळात ते नागपूरच्या राजकारणात सक्रिय झाले. आपण सनदी अधिकारी असताना डॉ. आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) सांस्कृतिक भवन परिसराच्या विकासासाठी तेव्हा आपण काय केले, असे विचारले असता, तेव्हा मुंबईत मंत्रालयात सचिव होतो, नागपुरात नव्हतो, येवढेच उत्तर देऊन त्यांनी अधिक बोलण्याचे टाळून हा विषय संपवला.

आमच्या मागण्यांसाठी २० डिसेंबर २०२२ रोजी नागपूर (Nagpur) विधान भवनावर आंबेडकरी जनता आणि संविधान प्रेमींनी मोर्चा काढला होता. त्याकडे शासनाने (State Government) दुर्लक्ष केल्यामुळे स्मारक परिसरात महिलांनी लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा ३५वा दिवस आहे. महिलांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच काढलेल्या एमटीडीसीवरील मोर्चाने हे सिद्ध झाले आहे. आता या आंदोलनाचा वणवा नागपूरच्या विविध भागांत पेटेल, असा इशाराही किशोर गजभिये यांनी आज दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com