मातोश्रीवर जाण्याचं स्वप्नही बघू नका; युवासेनेचा राणा दाम्पत्याला इशारा

Hanuman chalisa| Ravi Rana| navneet Rana| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचणार, असा इशारा रवी राणा यांनी दिला होता.
मातोश्रीवर जाण्याचं स्वप्नही बघू नका; युवासेनेचा राणा दाम्पत्याला इशारा
navneet Rana| Ravi Rana|

अमरावती : मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध हनुमान चालिसा चा वाद राज्यभरात पेटला आहे. या वादात युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचणार, असल्याचा इशारा काल आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिला होता.

यानंतर अमरावतीतील युवासेनेने आक्रमक पवित्रा घेत काल रात्री साडेदहा वाजता राणा दाम्पत्याच्या घरासमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा वाजवत आंदोलन केले. ३०मिनिट युवासेनेने राणा यांच्या घरासमोर आंदोलन केले. यानंतर राजा पेठ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केले. तर मातोश्रीवर जाण्याचं स्वप्नही बघू नका, हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सागर देशमुख यांनी यावेळी दिली.

 navneet Rana| Ravi Rana|
सतेज पाटलांच्या बालेकिल्यात भाजपचा शिरकाव; 'कसबा बावड्यात घेतली लक्षणीय मतं

विशेष म्हणजे रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते जितू दुधाने यांनी यावर प्रतिक्रीया दिली. युवासेनेने राणा दाम्पत्याच्या घरासमोर हे आंदोलन केले नसून घरापासून लांब असलेल्या ठिकाणी केले. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ संस्टबाजी म्हणून हे आंदोलन केले असल्याचे म्हणत त्यांनी युवासेनेची खिल्ली उडवली.

दरम्यान, आज हनुमान जयंती निमित्त राणा दाम्पत्याच्या घरी भोंगे वाटप करण्यात येणार आहे. त्याआधी राणा दाम्पत्य हनुमान मंदिरात दर्शन जाऊन हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत. त्यानंतर भोंगे वाटप केले जाईल.

काय म्हणाले होते रवी राणा ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. हनुमान जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’वर हनुमान चालिसाचे वाचन करावे, ते करणार नसतील तर आपण स्वत: नवनीत राणा यांच्यासह ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचे वाचन करू, असे आव्हान रवी राणा यांनी दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.