Ravikant Tupkar : पोलिसांच्या नोटीशीला भीक घालत नाही, जलसमाधी घेणारच : तुपकर ठाम!

Ravikant Tupkar : पोलिसांच्या नोटीशींनी माझ्या घरातलं कपाट भरले आहेत.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी तुपकरांना नोटीस पाठवलेली आहे. मुंबईच्या अरबी समुद्रात होणारे जलसमाधी आंदोलन थांबवा, अन्यथा कारवाई करू, असा इशारा पोलिसांनी तुपकरांना दिला आहे. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी तुपकरांच्या घरी जावून नोटीस बजावली. परंतु अशा नोटीशींना मी भीक घालत नाही, काही झालं तरी जलसमाधी आंदोलन करणारचं, असा ठाम निर्धार तुपकरांनी केला आहे.

सोयाबीन कापूस प्रश्नावर रविकांत तुपकर गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत आहेत. खाजगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 8,500 रुपये व कापसाचा भाव प्रति क्विंटल 12,500 रुपये स्थिर रहावा यासाठी सरकारने ठोस भूमिका सरकीरकडून घेण्यात यावी, अशी भूमिका घेतली होती. यासह शेतकऱ्यांच्या इतरही मागण्यांसाठी रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Ravikant Tupkar
Mohan Bhagawat : 'नरेंद्र मोदी आमचे स्वयंसेवक, मात्र त्यांच्यावर संघाचा दबाव नाही!'

6 नोव्हेंबर रोजी तुपकरांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांचा विराट मोर्चा निघाला होता. त्यावेळी तुपकरांनी मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन पेटवू,असा इशारा दिला होता. सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे तुपकरांनी मुंबईच्या मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासनाची आता चांगलीच तारांबळ उडालेली आहे. पोलिसांनी रविकांत तुपकरांना दिलेल्या नोटिशीमुळे त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. रविकांत तुपकर मात्र आंदोलनावर ठाम असल्यामुळे सरकार आणि तुपकरांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Ravikant Tupkar
सीमा प्रश्नावरील समितीत पवार, चव्हाण, राणे, फडणवीसांसह दानवेंचा समावेश

सरकार शेतकऱ्यांना जगूही देत नाही, मरुही देत नाही, अशा नोटीशीला आम्ही भीक घालत नाही, अश्या नोटीशांनी माझ्या घरातील कपाट भरले आहेत. जर सरकारला आमची प्रेतचं पाहिजे असतील तर 24 नोव्हेंबरला बघूनच घ्या, असेही तुपकर म्हणाले. मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात जलसमाधी घेणारचं, हिम्मत असेल तर अडवूनच दाखवा, असे आवाहनच रविकांत तुपकरांनी सरकारला दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in